टी २० क्रिकेटच्या स्वरूपात फलंदाजांचे वर्चस्व असल्याचे मानले जाते. फलंदाजांना पाहण्यासाठी चाहत्यांनाही खूप उत्सुकता असते, कारण प्रत्येकाची अशी इच्छा असते की त्यांनी त्यांच्या फलंदाजीने अधिक मनोरंजन केले पाहिजे. पण टी २० क्रिकेटमध्ये सर्वच फलंदाज यशस्वी होतात असे नाही.
टी २० क्रिकेटमध्ये गोलंदाजांनाही विशेष महत्त्व आहे. एखाद्या रोमांचक लढाई दरम्यान सामना जिंकवण्याची क्षमता गोलंदाजात असते
आयपीएलमध्येही बर्याच वेळा असे पाहिले गेले आहे, की गोलंदाजाने आपल्या जबरदस्त गोलंदाजीने संघाच्या कमी धावांचा बचाव केला आहे.
बऱ्याचदा मागील काही वर्षात सामना बरोबरीत सुटल्यानंतर सुपर ओव्हर घेतली जाते. नुकत्याच आयपीएलच्या १३ व्या हंगामात दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध किंग्स इलेव्हन पंजाब संघातील सामना बरोबरीत सुटल्यानंतर सुपर ओव्हरमध्ये गेला होता. यावेळी सुपर ओव्हरमध्ये दिल्लीकडून कागिसो रबाडाने शानदार गोलंदाजी प्रदर्शन करत पंजाबला केवळ २ धावांवर रोखले होते.
तर या लेखात तुम्हाला आयपीएलच्या प्रत्येक संघाच्या २ गोलंदाजांबद्दल सांगत आहोत जे या हंगामात सुपर ओव्हर टाकू शकतात.
चेन्नई सुपर किंग्ज
एमएस धोनीच्या नेतृत्वात चेन्नई सुपर किंग्ज संघ या वेळी हा हंगाम जिंकण्याचा प्रयत्न नक्की करेल. चेन्नई सुपर किंग्ज संघ हा एक बलाढ्य संघ आहे आणि तो नेहमीच एक चांगला स्पर्धक म्हणून या स्पर्धेत उतरतो. या संघात अनेक महान खेळाडू आहेत जे संघासाठी सामना जिंकवणार्याची भूमिका बजावतात.
ज्याप्रमाणे संघात सुपर-ओव्हर मध्ये फलंदाजी करणारे फलंदाज आहेत, त्याचप्रमाणे सुपर ओव्हरमध्ये गोलंदाजी करणारे गोलंदाजही या संघात आहेत जे आपल्या संघाला विजय मिळवून देऊ शकतात. या संघात मुख्यत: सुपर ओव्हरमध्ये गोलंदाजीसाठी ड्वेन ब्राव्हो आणि दीपक चहर हे आहेत. या दोघांनीही चेन्नईसाठी मागील काही वर्षात चांगली कामगिरी केली आहे.
दिल्ली कॅपिटल्स
आयपीएलच्या पहिल्या सत्रापासूनच दिल्ली कॅपिटल्स संघाला विजेतेपदाची अपेक्षा आहे. सातत्याने प्रयत्न करूनही दिल्ली कॅपिटल्स संघ आतापर्यंत यशस्वी होऊ शकला नाही. परंतु, दिल्ली कॅपिटल्सला गेल्या काही वर्षांत संघात काही चांगले खेळाडू मिळालेले आहेत.
संघात युवा आणि अनुभवी खेळाडूंचा उत्तम संतुलन आहे. या हंगामात दिल्ली संघाला कधी सुपर ओव्हर खेळण्याची पुन्हा संधी मिळाली तर गोलंदाज म्हणून कागीसो रबाडा हे एक सर्वोत्कृष्ट नाव असू शकते. संघाकडून सुपर ओव्हरमध्ये रबाडा व्यतिरिक्त आर अश्विन देखील चांगला पर्याय आहे.
किंग्ज इलेव्हन पंजाब
किंग्ज इलेव्हन पंजाब संघालाही आयपीएलचे विजेतेपद अजून मिळवता आले नाही. २०१४ मध्ये एकदा किंग्ज इलेव्हन पंजाबचा संघ अंतिम सामन्यापर्यंत पोहोचला होता. परंतु उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. त्यानंतर संघ काही खास करू शकला नाही.
यावेळी संघात कर्णधार केएल राहुल आणि प्रशिक्षक अनिल कुंबळेला काही चांगले खेळाडू मिळाले आहेत. किंग्ज इलेव्हन पंजाब संघातही सुपर ओव्हरच्या परिस्थितीमध्ये गोलंदाजीसाठी दोन उत्तम पर्याय आहेत, एक मोहम्मद शमी आणि दुसरा ख्रिस जॉर्डन. हे गोलंदाज त्यांच्या संघाला सुपर ओव्हरमध्ये गोलंदाजी करून संघाला विजय मिळवून देऊ शकतात.
कोलकाता नाईट रायडर्स
कोलकाता नाइट रायडर्सचा संघ नेहमीच आयपीएलमधील मजबूत म्हणून गणला जातो. गौतम गंभीरच्या नेतृत्वात केकेआरच्या संघाने दोन वेळा आयपीएल चषकावर आपले नाव कोरले आहे. परंतु नंतर या संघाला कोणतेही यश मिळाले नाही.
यावेळी केकेआरने यश मिळविण्यासाठी संघात अनेक बड्या खेळाडूंचा समावेश केला आहे. या संघात जागतिक दर्जाचे खेळाडू आहेत. या हंगामात केकेआर संघ सुपर ओव्हरमध्ये अडकल्यास त्यांच्याकडे पॅट कमिन्स आणि सुनील नरेनसारखे धोकादायक गोलंदाज गोलंदाजीसाठी आहेत.
मुंबई इंडियन्स
मुंबई इंडियन्स हा आयपीएलमधील सर्वात यशस्वी संघ आहे. हा संघ चार वेळा चॅम्पियन ठरला आहे. मुंबई इंडियन्स संघ प्रत्येक वेळी विजेतेपदासाठी प्रबळ दावेदार असतो. या हंगामातही मुंबई इंडियन्सच्या संघात काही खेळाडूंची भर पडली आहे. या वेळी संघाकडे मलिंगा नसला तरी जसप्रीत बुमराह आणि ट्रेंट बोल्ट संघाला सुपर ओव्हर मधून बाहेर काढू शकतात. सुपर ओव्हरसाठी हे २ उत्तम पर्याय मुंबई संघाकडे आहेत.
रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर
रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरच्या संघाला प्रत्येक वेळी निराशाचा सामना करावा लागला आहे. संघात विराट कोहलीसारखा कर्णधार आहे. तर विराट कोहली व्यतिरिक्त असेही काही खेळाडू आहेत, ज्यांच्यात संघाला जिंकवण्याची क्षमता आहे.
जर सुपर ओव्हर असेल तर फलंदाजीची काही मोठी नावे आहेत, तर गोलंदाजीत संघाला सुपर ओव्हरमधून वाचवण्याची जबाबदारी एक प्रकारे डेल स्टेनवर सर्वाधिक असेल. डेल स्टेन व्यतिरिक्त संघात नवदीप सैनी चा विचार करता येईल.
सनरायझर्स हैदराबाद
आयपीएलमधील काही संघांची गोलंदाजी खूप जबरदस्त आहे. या हंगामात खेळणार्या संघांच्या गोलंदाजीच्या दृष्टीकोनातून पाहिले तर सनरायझर्स हैदराबाद संघ सर्वात धोकादायक आहे. सनरायझर्स हैदराबाद संघ त्यांच्या संघातील संतुलनामुळे प्रत्येक हंगामात एक मजबूत दावेदार असतो.
तसे संघाने केवळ एकदाच जेतेपद जिंकले आहे. सनरायझर्स हैदराबाद संघाकडे सुपर ओव्हर टाकण्यासाठी अनेक पर्याय आहेत. परंतु सुपर ओव्हरमध्ये गोलंदाजी करण्याची अधिक शक्यता भुवनेश्वर कुमार याशिवाय रशिद खानवर असेल.
राजस्थान रॉयल्स
या वेळी आयपीएलमध्ये राजस्थान रॉयल्स संघ अंडर डॉग म्हणून मैदानात उतरला आहे. राजस्थान रॉयल्स संघाकडून कोणालाही फारशी अपेक्षा नसली तरी संघात असे अनेक खेळाडू आहेत जे संघाला चॅम्पियन बनवू शकतात. राजस्थान रॉयल्सचे २००८ नंतर दुसऱ्यांदा विजेतेपद जिंकण्याचे स्वप्न आहे.
हे स्वप्न यावेळी साकार देखील होऊ शकतो. गोलंदाजीत संघात मोठी नावे आहेत. या वेळी एखाद्या सामन्यात संघाला सुपर ओव्हरचा सामना करावा लागला तर त्यांच्याकडे जोफ्रा आर्चर सारख्या गोलंदाजाचा पर्याय आहे. तर दुसरे नाव जयदेव उनाडकटचे असू शकेल. तोही एक प्रभावशाली गोलंदाज आहे.