रविवारी आयपीएल 2018च्या साखळी फेरीतील शेवटचे सामने पार पडले. शेवटच्या सामन्यापर्यंत आयपीएल प्ले-आॅफच्या चौथ्या संंघासाठी चुरस पहायला मिळाली.
अखेर मुंबई इंडियन्स आणि किंग्ज इलेव्हन पंजाब पराभूत झाल्याने राजस्थान रॉयल्सला प्ले-आॅफमध्ये प्रवेश मिळाला.
यामुळे 11 आयपीएल मोसमात पहिल्यांदाच असे घडले की आयपीएल प्ले-आॅफला पात्र ठरलेले चारही संघांनी किमान एकदा तरी आयपीएलचे विजेतेपद मिळवले आहे.
यावर्षी सनरायझर्स हैद्राबाद, चेन्नई सुपर किंग्ज, कोलकता नाईट रायडर्स आणि राजस्थान रॉयल्स हे चार संघ प्ले-आॅफला पात्र ठरले आहेत.
यातील सनरायझर्स हैद्राबादने 2016ला आणि राजस्थान रॉयल्सने 2008ला असे एकदा, तर चेन्नई सुपर किंग्जने 2010, 2011 आणि कोलकता नाईट रायडर्सने 2012, 2014 असे दोनदा आयपीएलचे विजेतेपद जिंकले आहे.
आयपीएल 2018च्या प्ले-आॅफचे सामने मंगळवार, 22 मे पासून सुरू होत आहे.
असे होतील आयपीएल 2018च्या प्ले-आॅफचे सामने:
22 मे: क्वालिफायर 1 – सनरायझर्स हैद्राबाद विरुद्ध चेन्नई सुपर किंग्ज
23 मे: एलिमिनेटर – कोलकता नाईट रायडर्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स
25 मे: क्वालिफायर 2 – क्वालिफायर 1 चा पराभूत संघ विरुद्ध एलिमिनेटरचा विजयी संघ
27 मे: अंतिम सामना – क्वालिफायर 1चा विजयी संघ विरुद्ध क्वालिफायर 2चा विजयी संघ
महत्त्वाच्या बातम्या-
–व्हिडिओ व्हायरल- मुंबई हारली, पंजाब संघाची मालकीण प्रीती झिंटा खुष
–कोण आहे रोहित शर्मा? शेजारी बसलेल्या प्रवाशाने रोहितला पाहताच काय केले पहा?
–रैनाच आहे आयपीएल विक्रमांचा बादशाह, रोहितचा विक्रम दोन दिवसात मोडला
–फक्त या कारणामुळे झाला मुंबई इंडियन्सचा पराभव?
–असा विचित्र योगायोग आयपीएलमध्ये पुर्वी कधीच झालाच नाही!
–टाॅप ७- या खेळाडूंनी केल्या आहेत आयपीएलमध्ये ४००० धावा
–धोनीच आहे आयपीएलमधील सर्वात हुशार विद्यार्थी, सर्व परीक्षेत १०० पैकी १०० गुण