भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाच सामन्यांची कसोटी मालिका 4 ऑगस्टपासून नॉटिंगहॅमच्या ट्रेंट ब्रिज मैदानावर सुरू होणार आहे. दोन्ही संघांनी एकमेकांविरुद्ध एकूण 126 कसोटी सामने खेळले आहेत, ज्यात इंग्लंडने 48 आणि भारताने 29 सामने जिंकले आहेत, तर 49 सामने अनिर्णित राहिले आहेत.
या दोन्ही संघातील सामन्यांकडे नेहमीच चाहत्यांसह अनेक दिग्गजांचेही लक्ष असते. आत्तापर्यंत अनेकदा या दोन संघात अविस्मरणीय सामने खेळले गेले आहेत. तसेच अनेक खेळाडूंनी दमदार कामगिरीही केली आहे. या लेखातून आपण त्या 5 फलंदाजांबद्दल जाणून घेऊ, ज्यांनी भारत-इंग्लंड कसोटी सामन्यांमध्ये सर्वाधिक धावा केल्या आहेत.
1. सचिन तेंडुलकर
या यादीत पाहिले नाव आहे मास्टर-ब्लास्टर सचिन तेंडुलकर याचे. भारत-इंग्लंड कसोटी सामन्यांत सचिन सर्वाधिक धावा करणारा खेळाडू आहे. सचिनने इंग्लिश संघाविरुद्ध 32 कसोटी सामन्यांच्या 53 डावांमध्ये 2535 धावा केल्या आहेत. ज्यात त्याच्या नावावर 7 शतके आणि 13 अर्धशतके आहेत आणि त्याची सर्वोत्तम धावसंख्या 193 धावा आहे.
2. सुनील गावस्कर
साधारण 70 आणि 80 च्या दशकातील प्रत्येक गोलंदाजाला भारतीय फलंदाज सुनील गावसकर यांच्या बॅटचा कहर माहीत आहे. इंग्लंड आणि भारत यांच्यातील कसोटी सामन्यांत सर्वाधिक धावा करणाऱ्यांच्या यादीत ते दुसऱ्या स्थानावर आहेत. त्याच्या क्रिकेट कारकिर्दीत गावस्करने इंग्लंडविरुद्ध 38 कसोटी सामन्यात 67 डाव खेळले ज्यात त्याने 2483 धावा केल्या. यादरम्यान त्यांनी 4 शतके आणि 16 अर्धशतके केली आणि त्याचा सर्वोत्तम स्कोअर 221 धावांचा होता.
3. ऍलिस्टर कुक
इंग्लंड संघाचा माजी सलामीवीर ऍलिस्टर कुक हा भारत-इंग्लंड कसोटी सामन्यांमध्ये पहिल्या पाच सर्वाधिक धावा करणाऱ्यांपैकी एकमेव इंग्लिश खेळाडू आहे. या यादीत तो तिसऱ्या स्थानावर आहे. कुकने भारताविरुद्ध 30 सामन्यांमध्ये 54 डावांमध्ये 2431 धावा केल्या. यादरम्यान, त्याने 7 शतके आणि 9 अर्धशतके केली, ज्यात त्याची सर्वोत्तम धावसंख्या 294 धावा होती.
4. राहुल द्रविड
‘द वॉल’ म्हणून प्रसिद्ध असलेल्या राहुल द्रविडने इंग्लंडविरुद्ध उत्कृष्ट फलंदाजी केली आहे. या यादीत तो चौथ्या क्रमांकावर आहे. द्रविडने 21 कसोटी सामन्यांच्या 37 डावांमध्ये 1950 धावा केल्या आहेत. ज्यात त्याने 7 शतके आणि 8 अर्धशतके केली आणि त्याची सर्वोत्तम धावसंख्या 217 धावा होती.
5. गुंडप्पा विश्वनाथ
या यादीत पाचव्या क्रमांकावर आहे गुंडप्पा विश्वनाथ. गुंडप्पा विश्वनाथ यांनी इंग्लंडविरुद्ध 21 कसोटी सामन्यांच्या 37 डावांमध्ये 1880 धावा केल्या. त्यांनी 4 शतके आणि 14 अर्धशतके केली, ज्यात त्याची सर्वोत्तम धावसंख्या 222 धावा होती.
महत्त्वाच्या बातम्या –
“भारतीय संघ इंग्लंडविरुद्ध ४-० किंवा ३-१ अशी बाजी मारणार”, दिग्गज भारतीय खेळाडूचे भाकीत
अगरवालही दुखापतग्रस्त, आता रोहितबरोबर सलामीला फलंदाजी करणार कोण? गावसकरांनी घेतलं ‘या’ खेळाडूचं नाव
‘हे’ धुरंदर अष्टपैलू घेऊ शकतात स्टोक्सची जागा, आजवर केली आहे अप्रतिम कामगिरी