---Advertisement---

“भारतीय संघ इंग्लंडविरुद्ध ४-० किंवा ३-१ अशी बाजी मारणार”, दिग्गज भारतीय खेळाडूचे भाकीत

On: मंगळवार, ऑगस्ट 3, 2021 7:56 PM
---Advertisement---

भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यात ४ ऑगस्टपासून ५ कसोटी सामन्यांची मालिका खेळली जाणार आहे. या मालिकेसाठी दोन्ही संघ सरावात घाम गाळताना दिसून येत आहेत. ही मालिका दोन्हीही संघासाठी अतिशय महत्वाची असणार आहे. अत्यंत हायप्रोफाईल मानल्या जाणाऱ्या या मालिकेत कोण विजय मिळवणार? याबाबत अनेक तर्क-वितर्क लावले जात आहे. भारतीय संघाचे सर्वकालीन महान सलामीवीर व समालोचक सुनील गावसकर यांनी देखील या मालिकेत कोणता संघ बाजी मारणार याबाबत भाकीत केले आहे.

हा संघ मारणार बाजी
सध्या इंग्लंडमध्ये असलेल्या सुनील गावसकर यांनी आगामी मालिकेत कोणता संघ सरस ठरेल याबाबत बोलताना म्हटले, “मला वाटते की या पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेत पाहुणा भारतीय संघ ४-० अथवा ३-१ अशा फरकाने मालिका आपल्या नावे करेल. मात्र, या काळात इंग्लंडमधील वातावरण कसे असेल, यावर सर्वकाही अवलंबून आहे.”

गावसकर यांनी या मुलाखतीत भारतीय संघाचा यष्टीरक्षक रिषभ पंत व या मालिकेतून पुनरागमन करण्याच्या तयारीत असलेल्या केएल राहुल यांचे विशेष कौतुक केले.

इंग्लंड संघ आहे अडचणीत
इंग्लंड संघ या मालिकेत काहीसा कमकुवत समजला जात आहे. त्यांचे अनुनभवी फलंदाज चांगल्या फॉर्ममध्ये नाहीत. दुसरीकडे, अनुभवी अष्टपैलू बेन स्टोक्स याने मालिकेतून माघार घेतली आहे. प्रमुख वेगवान गोलंदाज ख्रिस वोक्स टाचेच्या तर, जोफ्रा आर्चर कोपराच्या दुखापतीमुळे मालिकेत खेळणार नाहीत.

इंग्लंड विरुद्ध भारत कसोटी मालिकेचे वेळापत्रक
पहिली कसोटी- ४ ते ८ ऑगस्ट, नॉटिंघम
दुसरी कसोटी- १२ ते १६ ऑगस्ट, लॉर्ड्स
तिसरी कसोटी- २५ ते २९ ऑगस्ट, लीड्स
चौथी कसोटी- २ ते ६ सप्टेंबर, द ओव्हल
पाचवी कसोटी- १० ते १४ सप्टेंबर, मॅनचेस्टर

इंग्लंड विरुद्धच्या मालिकेसाठी भारतीय संघ-
विराट कोहली (कर्णधार), अजिंक्य रहाणे (उपकर्णधार), रोहित शर्मा, अभिमन्यू ईस्वरन, पृथ्वी शॉ, केएल राहुल, वृद्धिमान साहा, चेतेश्वर पुजारा, हनुमा विहारी, रिषभ पंत, आर अश्विन, रविंद्र जडेजा, अक्षर पटेल, सूर्यकुमार यादव, इशांत शर्मा, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, शार्दुल ठाकूर व उमेश यादव.

महत्त्वाच्या बातम्या – 

अगरवालही दुखापतग्रस्त, आता रोहितबरोबर सलामीला फलंदाजी करणार कोण? गावसकरांनी घेतलं ‘या’ खेळाडूचं नाव

‘हे’ धुरंदर अष्टपैलू घेऊ शकतात स्टोक्सची जागा, आजवर केली आहे अप्रतिम कामगिरी

“जे पंतने केले ते गांगुलीनेही कधी केले नव्हते”, जेम्स अँडरसन झाला प्रभावित

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---