जगातील दिग्गज क्रिकेटपटूंमध्ये दक्षिण आफ्रिकेचा माजी खेळाडू एबी डीविलियर्स याचेही नाव घेतले जाते. ‘मिस्टर 360 डिग्री’ म्हणून ओळखला हा जाणारा हा खेळाडू जसा मैदानात आक्रमक आहे, तसाच तो त्याच्या वैयक्तिक जिवनात खूप रोमँटिक देखील आहे. रविवार (18 एप्रिल) रोजी खेळल्या गेलेल्या कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळूरु सामन्यात त्याची पत्नी आणि मुले त्याच्या आरबीसी संघाचे समर्थन करताना दिसली होती. त्यांचा हा फोटो सोशल मीडियावर खूप व्हायरल झाला होता.
https://twitter.com/lodulalit001/status/1383761444739588100?s=20
डीविलियर्स आणि त्याची पत्नी डॅनियल यांना एकूण तीन मुले आहेत. गेल्यावर्षी नोव्हेंबरमध्ये त्याच्या घरात एका परीचे आगमन झाले असून तीचे नाव येंटे डीविलियर्स आहे. सध्या ती 5 महिन्यांची आहे. तसेच त्यांना दोन मुलेदेखील आहेत. मोठ्या मुलाचे नाव अब्राहम आणि धाकट्या मुलाचे नाव जॉन रिचर्ड आहे.
https://www.instagram.com/p/CJO5pjRg5sw/?igshid=10vuusc0ajerf
https://www.instagram.com/p/BqCvFoDFtsd/?igshid=xl9h0n0qsyy1
2007 साली डीविलियर्सने आणि डॅनियल स्वर्टची यांची भेट झाली होती. प्रथम ते दोघे कौटुंबिक मित्र होते. परंतु नंतर त्यांच्या मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले. डीविलियर्सने त्याच्या पत्नीला 2013 रोजी ताजमहालसमोर प्रपोज केला होता आणि त्यानंतर त्याचवर्षी 30 मार्च रोजी ते दोघे विवाह बंधनात अडकले होते.
https://www.instagram.com/p/BvoPYlNlp7q/?igshid=ek888ij3qbi0
डीविलियर्सची पत्नी डॅनियल ही सोशल मीडियावर खूप प्रसिद्ध आहे. तीचे इंस्टाग्रामवरती 408k फॉलोअर्स आहेत. तिला तीन मुले असून सुद्धा खूप तंदुरुस्त असून सुंदरतेने कोणत्या अभिनेत्रीपेक्षा कमी नाही.
https://www.instagram.com/p/B27hcesgegT/?igshid=14rwx77u764tr
तर तिचा पती एबी डिव्हिलियर्स हा जगातील दिग्गज क्रिकेटर असून त्याने आपल्या आयपीएल कारकीर्दीत 172 सामन्यात 4972 धावा केल्या आहेत. ज्यामध्ये त्याची 133 ही सर्वोत्तम धावसंख्या आहे. त्याचबरोबर त्याने दक्षिण आफ्रिकेसाठी 114 कसोटी, 228 एकदिवसीय आणि 78 टी-20 सामने खेळले आहेत. ज्यामध्ये त्याने कसोटीत 8765 धावा केल्या आहेत, त्यामध्ये त्याची 278 ही सर्वोत्तम धावसंख्या आहे. यासह त्याने एकदिवसीय सामन्यात 9577 आणि टी-20 मध्ये 1672 धावा केल्या आहेत.
महत्त्वाच्या बातम्या-
एका विभागातही स्वत:ला सिद्ध करू शकला नाही, मग तो अष्टपैलू कसा? दिग्गजाची ‘या’ भारतीय खेळाडूला फटकार
चेन्नईच्या हातून राजस्थान चारीमुंड्या चित; कर्णधार संजू म्हणाला, “आम्हाला अपेक्षा नव्हती की…”
असे ५ कमनशिबी खेळाडू, जे सीएसकेचा होते भाग; पण एकदाही प्लेइंग इलेव्हनमध्ये मिळाले नाही स्थान