डेव्हिड वॉर्नर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केल्यापासून ऑस्ट्रेलिया संघाचा मुख्य सलामीवीर फलंदाज आहे. डेव्हिड वॉर्नर सध्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी करत आहे. त्याने सर्व फॉरमॅटमध्ये आपल्या उत्कृष्ट फलंदाजीने ऑस्ट्रेलिया संघासाठी अनेक सामने जिंकले आहेत. यासह ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार ऍलन बॉर्डरने क्रिकेट ऑस्ट्रेलियाकडे (सीए) मागणी केली आहे की, डेव्हिड वॉर्नरवरील नेतृत्व बंदी लवकरात लवकर उठवावी. २०१८ मध्ये केपटाऊन कसोटीत सॅंडपेपर घोटाळ्यानंतर डेव्हिड वॉर्नर, स्टीव्ह स्मिथ आणि कॅमेरून बॅनक्रॉफ्ट यांना आंतरराष्ट्रीय आणि देशांतर्गत क्रिकेट खेळण्यास एक वर्षाची बंदी घालण्यात आली होती. ऑस्ट्रेलिया बोर्डाने स्टीव्ह स्मिथ आणि वॉर्नरवर दोन वर्षांची नेतृत्वाची बंदी घातली आहे. म्हणजेच सामना कोणताही असो, डेव्हिड वॉर्नरला आजीवन ऑस्ट्रेलिया संघाचा कर्णधार म्हणून नियुक्त करता येणार नाही.
ऍलन बॉर्डरची सीएकडे मागणी
मात्र, आता डेव्हिड वॉर्नरला ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार ऍलन बॉर्डरचा पाठिंबा मिळाला असून वॉर्नरवरील नेतृत्वाची बंदी उठवावी, अशी मागणी सीएकडे केली आहे. याआधी, ऑस्ट्रेलियाचा कसोटी कर्णधार पॅट कमिन्सनेही सीएला आवाहन केले होते की, आता वॉर्नरवरील नेतृत्वाची बंदी उठवावी. बॉर्डरने आपल्या नुकत्याच दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, खेळाडूने त्याची शिक्षा पूर्ण केली असून आता त्याच्यावरील ही बंदी उठवण्यात यावी.
बॉर्डरने वेस्ट ऑस्ट्रेलियनला सांगितले की, “पहिल्यांदा ही कठोर शिक्षा होती पण ठीक आहे पुढे जाऊया. त्याने आपली शिक्षा पूर्ण केली आहे. मला माहित आहे की इतर प्रत्येक संघ आम्ही ज्यासाठी पकडले गेले ते करत आहे. जर सर्व कर्णधारांनी त्यांच्या अंतःकरणात हात ठेवून म्हटले की आम्ही हे केले नाही तर याचा अर्थ ते खोटे बोलत आहेत. या खेळाडूंना जी बंदी आली ती अत्यंत कठोर होती.”
दरम्यान, स्टीव्ह स्मिथवर देखील या प्रकरणात नेतृत्वाची बंदी घातली गेली होती. पण ऍशेस २०२१-२२ हंगामापूर्वी त्याला ऑस्ट्रेलियन संघाचा उपकर्णधार बनवले गेले होते. स्मिथ आजही ही भूमिका पार पाडत आहे. काही दिवसांपूर्वीच डेविड वॉर्नरला मिळणाऱ्या या चुकीच्या वागणूकीवर त्याची पत्नीने आवाज उठवला होता. वॉर्नर जर भारतात आयपीएल संघाचे नेतृत्व करू शकतो, तर ऑस्ट्रेलियन संघाचे का नाही ?, असा प्रश्न त्याच्या पत्नीने उपस्थित केला होता.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या –
चांगली खेळी करूनही श्रेयस अय्यरला वाटतोय हा धोका! म्हटला, ‘पुढच्या सामन्यात…’
धोनीला सुप्रीम कोर्टाचा दणका! इतके कोटी बुडण्याची शक्यता