पुणे: पीवायसी आणि हवेली तालुका बॅडमिंटन असोसिएशन (एचटीबीए) यांच्या संयुक्त विद्यमाने अमनोरा कप बॅडमिंटन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. स्पर्धेचे हे अकरावे वर्षे आहे. २२ ते २८ डिसेंबरदरम्यान पीवायसी क्लबच्या बॅडमिंटन कोर्टवर ही स्पर्धा होणार आहे,अशी माहिती स्पर्धेचे संयोजन सचिव उदय साने यांनी दिली.
या स्पर्धेत ३२ प्रकारांत १५४६ खेळाडू सहभागी होणार आहेत. ही स्पर्धा ११, १३, १५, १७, १९ वर्षांखालील मुले-मुली, पुरुष, महिला, ३०, ४०, ५० वर्षांवरील पुरुष गटात होणार आहे. स्पर्धेचे उद्घाटन २२ डिसेंबर रोजी सकाळी ८.३० वाजता पीडीएमबीएचे अध्यक्ष अनिरुद्ध देशपांडे, पीवायसीचे अध्यक्ष डॉ. सुधीर भाटे यांच्या हस्ते होणार आहे. हवेली तालुका बॅडमिंटन असोसिएशनचे अध्यक्ष अविनाश जाधव या वेळी उपस्थित राहणार आहेत.
स्पर्धेतील विजेत्यांना एकूण २ लाख रुपयांची रोख पारितोषिके देण्यात येणार आहेत. त्याचबरोबर प्रमाणपत्रही मिळणार आहे. तसेच, वर्षभर आणि स्पर्धेत देखील चांगली कामगिरी करणाºया खेळाडूला ५० हजार रुपयांची स्कॉलरशिपही देण्यात येणार आहे.
नरेंद्र पाटील, आदिती काळेला अग्रमानांकन
या स्पर्धेसाठी नरेंद्र पाटील आणि आदिती काळे यांना अनुक्रमे पुरुष आणि महिला गटात अग्रमानांकन देण्यात आले आहे.
मानांकन यादी – पुरुष एकेरी – १. नरेंद्र पाटील २. सोहम नवंधर ३. अभिषेक बोराटे ४. विनीत कांबळे
महिला एकेरी – १. आदिती काळे २. स्वराली चिटणीस ३. रिया पवार ४. कल्याणी लिमये
पुरुष दुहेरी -१. नरेंद्र गोगावले -विनीत कांबळे २. अजीत कुंभार-नरेंद्र पाटील ३. अनिरुद्ध मयेकर -हृत्विक अंबेकर ४. अभिषेक बोराटे- अमेय ओक
महिला दुहेरी -१. मानसी गाडगीळ -नुपूर सहस्त्रबुद्धे २. आदिती काळे – रिया जाईल.
मिश्र दुहेरी – १. ऋतुराज देशपांडे – आदिती काळे २. समीर भागवत – मानसी गाडगीळ.
१३ वर्षांखालील मुले एकेरी – १. आद्य पारसनीस २. श्रेयस साने ३. यशराज कदम ४. अर्जुन भगत ५. क्रिश खातवड
१३ वर्षांखालील मुली एकेरी – १. आरती चौगले २. अनन्या गाडगीळ ३. सानिका पाटणकर ४. संजना आंबेकर
१५ वर्षांखालील मुले एकेरी -१. प्रथम वाणी २. वर्धन डोंगरे ३. सुवीर प्रधान ४. सोहम भुतकर ५. आदित्य लोगनाथन
१५ वर्षांखालील मुली एकेरी – १. रुचा सावंत २. श्रेया उत्पट ३. सायली फाटक ४. रिद्धी पुडके.
१५ वर्षांखालील मुले दुहेरी – १. आर्य ठाकोरे – ध्रुव ठाकोरे २. प्रथम वाणी – वर्धन डोंगरे ३. लौकिक ताथेड – सोहम भुतकर ४. रोनक गुप्ता-सुवीर प्रधान
१५ वर्षांखालील मुली दुहेरी – १. सानिका पाटणकर – संजना अंबेकर २. हिमाली परब-मधुरा फडणीस.
१७ वर्षांखालील मुले एकेरी- १. प्रतीक धर्माधिकारी २. सस्मित पाटील ३. आयुष खांडेकर ४. वर्धन डोंगरे ५. पार्थ घुबे.
१७ वर्षांखालील मुली एकेरी -१. साद धर्माधिकारी २. शताक्षी किणीकर ३. रिद्धी पुडके ४. श्रेया शेलार.
१७ वर्षांखालील मुले दुहेरी – १. आयुष खांडेकर-पार्थ घुबे २. सस्मित पाटील – वेंकटेश अगरवाल
१९ वर्षांखालील मुले एकेरी – १. सोहन नवंदर २. प्रतीक धर्माधिकारी ३. पार्थ देशपांडे ४. आयुष खांडेकर
१९ वर्षांखालील मुली एकेरी – १. तनिष्का देशपांडे २. रिया कुंजिर ३. गौरी कुलकर्णी ४. सारिका गोखले.
१९ वर्षांखालील मुले दुहेरी -१. सोहम पाटील – तेजस देव २. चिन्मय कुलकर्णी -विराज बिदये.
३० वर्षांवरील पुरुष एकेरी – १. अक्षय गद्रे २. अपूर्व जावडेकर ३. अद्वैत सहस्त्रबुद्धे ४. हर्षद भागवत.
४० वर्षांवरील पुरुष एकेरी – १. अमीत तारे २. निखिल साने ३. महेश कुलकर्णी ४. हसप्रीत सहानी.
४० वर्षांवरील पुरुष दुहेरी – १. अमित देवधर -महेश उतगिकर २. हर्षवर्धन दामले – विश्वनाथ भिडे ३. अनिरुद्ध जोशी – सुहास नाईक ४. दीपक पटवर्धन – समीर भाटे.