---Advertisement---

ब्रेकिंग! CSKच्या खेळाडूची फायनलपूर्वीच निवृत्ती, क्रिकेटक्षेत्रात खळबळ

On: रविवार, मे 28, 2023 6:06 PM
CSK
---Advertisement---

इंडियन प्रीमियर लीग 2023च्या अंतिम सामन्यापूर्वी सीएसके चाहत्यांसाठी निराशाजनक बातमी समोर आली. भारतीय संघाचा अनुभवी फलंदाज अंबाती रायुडू याने आयपीएल कारकीर्द संपवण्याचा निर्णय घेतला आहे. रविवारी (28 मे) सीएसकेसाठी तो आपला शेवटचा आयपीएळ सामना खेळेल. अंतिम सामन्यात सीएसकेपुढे गुजरात टायटन्सचे आव्हान आहे. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियवर हा सामना खेळला जाणार आहे.

दरम्यान, इंडियन प्रीमियर लीगच्या या आयपीएल हंगामात अंबाती राडून (Ambati Rayudu) सीएसकेसाठी अपेक्षित प्रदर्शन करू शकला नाही. त्याने हंगामातील 15 सामन्यांतील 11 डावांमध्ये अवघ्या 139 धावा केल्या. यादरम्यान त्याची सरासरी धावसंख्या अवघी 15.44 होती. हंगामात त्याच्या नावावर 9 चौकार आणि 7 षटकारांची नोंद आहे.

रायुडूच्या एकंदरीत आयपीएल कारकिर्दीचा विचार केला, तर त्याने या लीगमध्ये जास्त संघ बदलले नाहीत. मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्ज या बलाढ्या संघांचे प्रदर्शन करण्याची संधी रायुडूला मिळाली. रविवारी तो आपल्या आयपीएल कारकिर्दीतील 203 वा सामना गुजरात टायटन्सविरुद्ध खेळणार आहे. आतापर्यंत खेळलेल्या 202 आयपीएल सामन्यांमध्ये 28.11 च्या सरासरीने त्याने एकूण 4329 धावा केल्या आहेत. 100 ही त्याची आयपीएलमधील सर्वोत्तम धावसंख्या राहिली आहे. यादरम्यान त्याने एकूण 22 अर्धशतकेही ठोकली आहेत.

रायुडूने आपल्या सोशल मीडिया खात्यावरून पोस्ट केली की, “दोन सर्वोत्तम संघ, 204 सामने (क्रिकबझच्या माहितीनुसार 202), 14 प्लेऑफ्स, 11 प्लेऑफ्स, 8 अंतिम सामने, 5 आयपीएल ट्रॉफी. आशा आहे आज सहावी ट्रॉफी जिंकेल. खूप प्रवास झाला. मी ठरवलं आहे की आज रात्री आपला शेवटचा आयपीएल सामना खेळेल. मी खरोखर या लीगमध्ये खेळण्याचा आनंद घेतला. धन्यवाद, आता निर्णयावर यू टर्न नाही.”

रायुडूच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीचा विचार केला, तर त्याने भारतासाठी 55 वनडे आणि 6 टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. याद त्याने अनुक्रमे 1694 आणि 42 धावांचे योगदान दिले आहे. कसोटी क्रिकेटमध्ये त्याला संधी मिळाली नाहीये. दरम्यान, सीएसकेने आतापर्यंत एकूण 4 आपीएल ट्रॉफी जिंकल्या आहेत. संघ जर यावेळीही आयपीएल ट्रॉफी जिंकली, तर रायुडूसाठी हा सर्वोत्तम निरोप असेल.(Ambati Rayudu annouced his retirement from IPL)

बातमी अपडेट होत आहे…
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
मानलं रे पठ्ठ्या! सराव सत्रातच दुबेचा राडा, IPL फायनलमध्ये होणार तांडव; मोठा विक्रम निशाण्यावर, Video
आयपीएल फायनलपूर्वीच सीएसकेच्या महत्वपूर्ण सदस्याने म्हटले ‘थँक्यू’, भावनिक पोस्ट शेअर करत लिहिले…

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---