---Advertisement---

सीएसकेने सामना जिंकला, पण अंबाती रायुडूच्या नावे झाला आयपीएल इतिहासातील नकोसा विक्रम

On: शनिवार, एप्रिल 17, 2021 8:19 AM
Ambati-Rayudu
---Advertisement---

इंडियन प्रीमियर लीग स्पर्धेत शुक्रवारी (१६ एप्रिल) पार पडलेल्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्ज आणि पंजाब किंग्ज हे संघ आमने सामने होते. या सामन्यात चेन्नई सुपर किंग्ज संघाने ६ गडी राखून एकहाती विजय मिळवला. चेन्नई सुपर किंग्ज संघाकडून दीपक चाहरने उत्कृष्ट गोलंदाजीचे प्रदर्शन करत पंजाब किंग्ज संघाच्या फलंदाजी क्रमाचे कंबरडे मोडले. या सामन्यात अंबाती रायुडू पूर्णपणे फ्लॉप ठरला. तसेच त्याने नकोसा असलेला विक्रम आपल्या नावावर केला आहे.

पंजाब किंग्ज संघाने प्रथम फलंदाजी करताना अवघ्या १०६ धावा केल्या होत्या. या धावांचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या चेन्नई सुपर किंग्ज संघाकडून सुरेश रैना बाद झाल्यानंतर अंबाती रायुडू फलंदाजी करण्यासाठी आला होता. त्याला मोहम्मद शमीने भोपळाही न फोडता माघारी धाडले. यासोबतच त्याने आयपीएल इतिहासात सर्वाधिक वेळेस शून्य धावांवर बाद होण्याच्या नकोश्या यादीत अनेक दिग्गज खेळाडूंच्या विक्रमाची बरोबरी केली आहे.

आयपीएल इतिहासात सर्वाधिक वेळा शून्य धावांवर बाद होणारे फलंदाज 
अंबाती रायुडू -१३
रोहित शर्मा -१३
अजिंक्य रहाणे -१३
हरभजन सिंह -१३
पार्थिव पटेल -१३

पंजाब किंग्ज संघाचे फलंदाज ठरले फ्लॉप
पंजाब किंग्ज संघाला प्रथम फलंदाजी करताना,२ ० षटकअखेर अवघ्या १०६ धावा करण्यात यश आले होते. पंजाब किंग्ज संघाकडून शाहरुख खानने सर्वाधिक ४७ धावांची खेळी केली. तर रिचर्डसनने १५ धावांचे योगदान दिले. तसेच संघातील मुख्य फलंदाज केएल राहुल ५ धावा करत माघारी परतला होता. तर ख्रिस गेलने अवघ्या १० धावा केल्या होत्या. तसेच मयंक अगरवाल (० धावा) या सामन्यात देखील फ्लॉप ठरला आहे. यासोबतच निकोलस पूरन देखील ० धावा करत माघारी परतला होता.

चेन्नई सुपर किंग्ज संघाने ६ गडी राखून मिळवला विजय
पंजाब किंग्ज संघाने दिलेल्या १०७ धावांचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या चेन्नई सुपर किंग्ज संघाकडून फाफ डू प्लेसिसने ३६ धावांची खेळी केली. तर मोईन अलीने ताबडतोड ४६  धावांची खेळी केली. तसेच ऋतुराज गायकवाड ५ धावा करत माघारी परतला होता. या विजयासोबतच चेन्नई सुपर किंग्ज संघाने आयपीएल २०२१ स्पर्धेत पहिला विजय मिळवला आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

…म्हणून तब्बल ८०० विकेट घेणाऱ्या मुरलीधरनला साध्या ८० विकेट्सही घेता आल्या नसत्या!

विस्डेन २०२१ सर्वोत्कृष्ट खेळाडूंच्या यादीत ‘यांना’ मिळाले स्थान; एकाही भारतीयाचा नाही समावेश

वाह मानलं चाहर तुला! २०१७ पासून बनलाय पॉवर प्लेचा ‘सुपर किंग’; पाहा ही खास आकडेवारी

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---