---Advertisement---

अंबाती रायडूने निवृत्तीचा निर्णय घेतला मागे; ‘यांना’ दिले मन बदलण्याचे श्रेय

---Advertisement---

भारताचा फलंदाज अंबाती रायडूने दोन महिन्यांपूर्वी 3 जूलैला क्रिकेटमधून निवृत्ती घेतली होती. परंतू आता त्याने पुनर्विचार करत निवृत्तीचा निर्णय मागे घेतला आहे.

त्याने हैद्राबाद क्रिकेट असोसिएशनला इमेल लिहिला असून यात त्याने निवृत्तीचा निर्णय भावनिक असल्याचा म्हटले आहे. तसेच तो आता सर्वप्रकारच्या क्रिकेटसाठी संघात निवड प्रक्रियेसाठी उपलब्ध असल्याचेही त्याने सांगितले आहे.

रायडूने हैद्राबाद क्रिकेट असोसिएशनला लिहिलेल्या मेलमध्ये म्हटले आहे की ‘मी तूम्हाला सांगू इच्छितो की मी निवृत्तीचा निर्णय मागे घेत असून सर्व प्रकारच्या क्रिकेटमध्ये खेळणार आहे.’

याबरोबरच आयपीएलचे मागील दोन मोसम चेन्नई सुपर किंग्सकडून खेळणाऱ्या रायडूने म्हटले आहे की ‘मी चेन्नई सुपर किंग्सचे, व्हीव्हीएस लक्ष्मणचे आणि नोएल डेविड यांचे आभार मानू इच्छितो. त्यांनी कठीण काळात मला खूप सहकार्य केले आहे. तसेच माझ्यात अजून पुरेसे क्रिकेट शिल्लक आहे याची मला जाणीव करुन देण्यासाठी त्यांचे मोलाचे योगदान आहे.’

‘मी हैद्राबाद संघाबरोबर पुढिल शानदार मोसमात खेळण्यासाठी उत्सुक आहे. मी 10 सप्टेंबरपासून हैद्राबाद संघात सामील होण्यासाठी उपलब्ध आहे.’

तसेच हैद्राबाद क्रिकेट असोसिएशनचे सीओए यांनी इमेलमध्ये म्हटले आहे की ‘रायडूने निवृत्तीचा निर्णय मागे घेतला आहे. तो 2019-20 मोसमासाठी मर्यादीत षटकांच्या क्रिकेटसाठी उपलब्ध आहे.’

इंग्लंड आणि वेल्समध्ये पार पडलेल्या 2019 विश्वचषकात अंबाती रायडूला भारतीय संघात संधी मिळाली नव्हती.

तसेच हा विश्वचषक सुरु असताना भारताचे शिखर धवन आणि विजय शंकर हे दोन खेळाडू दुखापतग्रस्त होऊन बाहेर पडल्यानंतरही राखीव खेळाडू असलेल्या अंबाती रायडूला भारतीय संघात संधी मिळाली नव्हती. त्यानंतर अंबाती रायडूने निवृत्तीचा निर्णय घेतला होता.

याबरोबरच रायडूने मागीलवर्षी मर्यादीत षटकांच्या क्रिकेटमध्ये लक्ष्य केंद्रित करण्यासाठी प्रथम श्रेणी क्रिकेटमधून निवृत्ती घेतली होती.

क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.

महत्त्वाच्या बातम्या –

आज मैदानात पाऊल ठेवताच कर्णधार कोहली करणारा हा खास विक्रम

विराट कोहलीकडून ‘कॅप्टनकूल’ एमएस धोनीच्या या सर्वात मोठ्या विक्रमाला धोका…

हा मोठा पराक्रम करण्यापासून इशांत शर्मा केवळ एक विकेट दूर

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---

Leave a Comment