सध्याच्या आधुनिक युगात लहान मुलांपासून वयस्कर व्यक्तींपर्यंत सर्वजण मोबाईल फोनचा वापर करतात. मोबाईल फोन हा सर्वांसाठीच प्राथमिक गरज बनला आहे. परंतु भारतीय संघाचा हा खेळाडू मोबाईल फोनचा वापरच करत नाही.
हा खेळाडू इतर कोणी नसून भारतीय संघाचा फलंदाज आणि आयपीएलमधील चेन्नई सुपर किंग्स संघाचा खेळाडू अंबाती (Ambati Rayudu) रायडू आहे. तो मोबाईल फोनचा वापर करत नाही. खरं तर एक वर्षापूर्वी भारतीय संघाचा फिरकीपटू गोलंदाज हरभजन सिंगला (Harbhajan Singh) दिलेल्या मुलाखतीत रायडूने या गोष्टीचा खुलासा केला होता.
यावेळी हरभजनने सांगितले होते की, “रायडू एक असा व्यक्ति आहे, तो काय करतो हे कोणालाच कळत नाही. तो कधी फोनचा वापर करत नाही.”
यावर रायडूने हसत प्रत्युत्तर दिले होते की, पाजी माझ्याकडे मोबाईल फोन (Mobile Phone) नाही. यावेळी हरभजनने त्याला सहज विचारले होते की, एकदा तू मला फोन केला होता तो नंबर कोणाचा होता? यावेळी रायडू म्हणाला होता की, पाजी तो नंबर माझ्या पत्नीचा होता. मला कधी गरज पडली तर मी माझ्या पत्नीच्या मोबाईलवरून फोन करत असतो.
मागील वर्षी वनडे विश्वचषकात भारतीय संघात संधी न मिळाल्यामुळे रायडूने निवृत्ती घेतली होती. परंतु माध्यमांमध्ये अशाही बातम्या होत्या की, रायडूने पुनरागमन केले आहे.
आता आयपीएल २०२०मध्ये रायडू खेळताना दिसेल की नाही हे पहावे लागेल.
ट्रेंडिंग घडामोडी-
-रोहितसह हे ४ खेळाडू आयपीएलमध्ये सर्वाधिक वेळा झिरोवर बाद
-१२ पैकी १२ आयपीएलमध्ये सुरेश रैनाने धावांचा असा पाडला आहे पाऊस
-एकाचवेळी विराटसह ७ खेळाडूंनी ट्विट करण्याचे कारणंही आहे तसंच मोठं