जगातील सर्वात मोठी व्यवसायिक टी२० लीग असलेल्या इंडियन प्रीमियर लीगच्या (IPL 2022) पंधराव्या हंगामाला शनिवारी (२६ मार्च) सुरुवात झाली. चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स (CSKvKKR) यांच्यातील सामना मुंबई येथील वानखेडे स्टेडियमवर खेळला गेला. या सामन्यातून श्रेयस अय्यर याने कोलकाता नाईट रायडर्ससाठी तर, रवींद्र जडेजा याने चेन्नई सुपर किंग्ससाठी कॅप्टन्सी डेब्यू केला. मात्र, चेन्नईच्या सामन्याची सुरुवात खराब झाली. फलंदाजांनी अत्यंत निराश केल्याने, चेन्नईचा संघ मोठी धावसंख्या उभारू शकला नाही. त्याचवेळी कर्णधार रवींद्र जडेजाने एक नाहक चूक केल्याने अंबाती रायुडूला पव्हेलियनचा मार्ग धरावा लागला.
हंगामातील पहिल्या सामन्यात नाणेफेक गमावल्यानंतर, चेन्नईला प्रथम फलंदाजी करावी लागली. ऋतुराज गायकवाड, डेवॉन कॉनवे आणि रॉबिन उथप्पा हे तीन फलंदाज ५० धावांच्या आत माघारी परतले. त्यानंतर अंबाती रायुडू चांगल्या लयीत खेळताना दिसत होता. पाचव्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या कर्णधार जडेजामुळे मात्र त्याला आपली विकेट गमवावी लागली.
सुनील नरीन टाकत असलेल्या नवव्या षटकातील चौथ्या चेंडूवर जडेजाने लेग साईडच्या दिशेने चेंडू मारला. जडेजा रन घेण्यासाठी दोन पावले पुढे आला असताना, नॉन स्ट्राइकवरील रायुडू वेगाने धावला. त्याचवेळी क्षेत्ररक्षण करत असलेल्या श्रेयस अय्यरने वेगात चेंडू उचलून नरीनकडे फेकला. त्यामुळे रायुडू धावबाद झाला. यानंतर रायुडू अत्यंत नाराज दिसला. त्याने एक चौकार व एका षटकाराच्या मदतीने १५ धावा केल्या.
#sad for @RayuduAmbati but this happen when you don't treat you senior wisely #IPL #runout pic.twitter.com/5jvBk37eH3
— neerajsharma (@neerajsharma797) March 26, 2022
सीएसकेची निराशाजनक फलंदाजी
या सामन्यात प्रथम फलंदाजीचे आमंत्रण मिळाल्यानंतर चेन्नईची सुरुवात खराब झाली. ६१ धावांमध्ये त्यांचे पाच फलंदाज बाद झालेले. त्यानंतर कर्णधार रवींद्र जडेजा व माजी कर्णधार एमएस धोनी यांनी सांभाळून खेळत, संघाला सन्मानजनक धावसंख्या गाठून दिली.
महत्वाच्या बातम्या-
अखेर मेहनत फळाला आली! तब्बल इतक्या सामन्यांच्या प्रतीक्षेनंतर जड्डू बनला कॅप्टन (mahasports.in)