भारतीय क्रिकेट संघाचा माजी दिग्गज कर्णधार महेंद्र सिंग धोनी अर्थात माही नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणांमुळे चर्चेत असतो. तो अखेरचा आयपीएल 2023 स्पर्धेत दिसला होता. त्यानंतर तो क्रिकेटपासून दूर आहे. यादरम्यान तो सुट्ट्यांचा आनंद घेत असून त्याचे वेगवेगळ्या ठिकाणचे फोटो आणि व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहेत. धोनीचे चाहते जगभरात आहेत. याचा प्रत्यय अनेकदा आला आहे. अशात अमेरिकेचे माजी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हेदेखील धोनीचे चाहते बनले आहेत. त्यांचे फोटो आणि व्हिडिओ जोरदार व्हायरल होत आहेत.
एमएस धोनी सध्या अमेरिकेत असून सुट्ट्यांचा आनंद घेत आहे. अशात, जेव्हा अमेरिकेचे माजी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना समजले, की धोनी अमेरिकेत आहेत, तेव्हा त्यांना धोनीला भेटण्याचा मोह आवरला नाही. त्यांनी धोनीला ट्रम्पनॅशनल गोल्फ क्लब बेडमिनस्टर येथे गोल्फ खेळण्यासाठी बोलावले होते. आता त्यांचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून चाहत्यांची मने जिंकत आहेत.
https://www.instagram.com/reel/Cw6vG1nSbH_/?utm_source=ig_embed&ig_rid=452f93fd-fb46-4203-bcc5-aa45f6b1151d
Former US President Donald Trump hosted a Golf game for MS Dhoni.
– Thala fever in USA….!!! pic.twitter.com/8V7Vz7nHMB
— Johns. (@CricCrazyJohns) September 8, 2023
यूएस ओपन 2023मध्ये दिसला धोनी
यूएस ओपन 2023 स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरी सामन्यात कार्लोस अल्कारेझ आणि झ्वेरेव हे आमने-सामने होते. हा सामना स्पेनचा अल्कारेझ याने आपल्या नावावर करत उपांत्य सामन्यात जागा मिळवले. हा सामना पाहण्यासाठी धोनीने हजेरी लावली होती. यादरम्यानचा व्हिडिओही सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला, ज्यात धोनी अल्कारेझच्या मागे बसल्याचे दिसत आहे.
Like us, @msdhoni is a tennis fan too 🥹
Indian cricket sensation Mahendra Singh Dhoni was in the audience for the quarter-final clash between @carlosalcaraz & @AlexZverev 🎾#SonySportsNetwork #USOpen | @usopen pic.twitter.com/STPmLlCdvS
— Sony Sports Network (@SonySportsNetwk) September 7, 2023
आयपीएल 2023मध्ये सीएसकेला जिंकून दिला पाचवा किताब
आयपीएल 2023 स्पर्धेत धोनीने आपल्या नेतृत्वाखाली चेन्नई सुपर किंग्स संघाला पाचवा किताब जिंकून दिला. यासोबतच सीएसकेने मुंबई इंडियन्स संघाचीही बरोबरी केली. अंतिम सामन्यानंतर धोनी म्हणाला होता, की तो फिट असला, तर तो चाहत्यांसाठी आयपीएल 2024 हंगामात खेळताना दिसू शकतो.
धोनीच्या कारकीर्दीविषयी बोलायचं झालं, तर त्याने भारताकडून 90 कसोटी सामने, 350 वनडे सामने आणि 98 आंतरराष्ट्रीय टी20 सामने खेळले आहेत. यादरम्यान कसोटीत त्याने 4876 धावा, वनडेत 10773 धावा आणि टी20त 1617 धावा केल्या आहेत. त्याच्या नावावर एकूण 16 आंतरराष्ट्रीय शतकांचीही नोंद आहे. (america ex president donald trump hosted former cricketer ms dhoni for golf match see photos and video)
हेही वाचाच-
शुबमनचे 24व्या वयात पदार्पण, करिअरमधील ‘या’ 5 विक्रमांमुळे ओळखला जातो टीम इंडियाचा ‘Prince’
फक्त 10 दिवसच टिकला पाकिस्तानचा नंबर वन! ‘या’ संघाने दिला अनपेक्षित धक्का