कोणत्याही खेळाचा प्राण हा त्या खेळाचे प्रेक्षक असतात असे म्हटले जाते. मैदानावर कोणतीही घटना घडली तर मैदानावर असलेले प्रेक्षक त्याचे खरे साक्षीदार मानले जातात. मैदानावरील प्रेक्षकच खेळाडूंचा आत्मविश्वास वाढवत असतात. अशीच प्रेक्षकांच्या साक्षीने एक अविस्मरणीय घटना अमेरिकेतील प्रमुख फुटबॉल लीग असलेल्या मेजर सॉकर लीगमध्ये (एमएसएल) घडली. अमेरिकेच्या एका फुटबॉलपटूने मैदानावरील हजारो प्रेक्षकांच्या साक्षीने आपल्या प्रेयसीला प्रपोज केले. या घटनेचा व्हिडीओ सध्या चांगलाच चर्चेत आहे.
अशी घडली घटना
एमएसएलमध्ये रविवारी (४ जुलै) उशिरा मिनीसोटा एफसी विरुद्ध सॅन होजे अर्थक्वेक असा सामना रंगला. पुर्णवेळेनंतर हा सामना २-२ अशा बरोबरीत सुटला. मात्र, सामन्यानंतर मैदानावर एक अजबच गोष्ट पाहायला मिळाली. मिनीसोटाचा फुटबॉलपटू हसानी डॉटसन स्टिफनसन याने भर मैदानात उपस्थित असलेल्या हजारो प्रेक्षकांच्या साक्षीने आपली प्रेयसी पेट्रा वुकोविच हिला प्रपोज केले.
हसानी याने अचानकपणे गुडघ्यावर बसत पेट्राला प्रपोज केले. हसानीच्या या कृत्याने पेट्रा आश्चर्यचकित झाली. काही क्षण तिचा यावर विश्वास बसला नाही व तिने आपला चेहरा झाकून घेतला. हसानी याने तीला अंगठी घातली. यानंतर उभयंतांनी एकमेकांना मिठी मारली. याक्षणी मैदानात उपस्थित असलेल्या सर्व प्रेक्षकांनी टाळ्या वाजवून व चीअर करत दोघांचे अभिनंदन केले. यानंतर दोघांनी आपापल्या सोशल मीडिया हँडलवरून हा व्हिडिओ शेअर केला.
https://www.instagram.com/p/CQ5Bnvis3Db/
आयपीएलमध्ये ही घडली आहे अशी घटना
जगातील सर्वांत श्रीमंत क्रिकेट लीग असलेल्या आयपीएलमध्येही अशा प्रकारची घटना घडली आहे. आयपीएल २०१६ च्या अंतिम सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या केरळच्या सचिन बेबी याने आपली प्रेयसी ऍना हिला प्रपोज केलेले. त्यानंतर, सचिन व ऍना यांनी २०१७ मध्ये लग्नगाठ बांधली. भारतीय संघ ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर गेला असताना सिडनी टी२० दरम्यान एका भारतीय प्रेक्षकाने आपल्या ऑस्ट्रेलियन प्रेयसीला लग्नाची मागणी घातली होती.
महत्त्वाच्या बातम्या –
युरो कप २०२०: उपांत्यपूर्व फेरीतील काही नेत्रदीपक गोल, पाहा व्हिडिओ