अमेरिकेन युवकांच्या फुटबॉल संघाने कार वळवताना झालेल्या अपघातातून दोन जणांना वाचवले.
बोईस ब्लॅक नाईट ह्या फुटबॉल संघाची गाडी ओरेगॉन येथून स्पर्धा संपवून परत जात होती. तेव्हा त्यांच्या गाडीसमोरून एक व्हॅनने खूप धोकादायक वळण घेलते.
याच वेळेस त्या व्हॅनला अपघात झाला. त्यावेळी त्या व्हॅनमध्ये दोन प्रवासी होते.
क्षणाचाही विलंब न लावता या फुटबॉल संघातील 13-14 वयोगटातील खेळाडू त्यांच्या गाडीतून उतरून त्या दोघांना मदत केली.
एकाला त्यांनी गाडीतून ओढून बाहेर काढले तर दुसऱ्याला काढताना गाडी एका बाजूने उचलून धरली.
https://twitter.com/StevenABC13/status/1002576671093022721
या युवकांनी केलेल्या मदतीने त्यांचे प्रशिक्षक रूडी जॅक्सन खूप भारावले. त्यांनी फेसबूकवरून या घटनेचा व्हिडीओही शेयर केला.
“मला या खेळाडूंवर खूप अभिमान आहे. त्यांनी मैदानावर आणि बाहेरही चांगले काम केले आहे. फुटबॉल चॅम्पियन म्हणून सुरू झालेला हा प्रवास यंग हिरो म्हणून संपला”, असे जॅक्सन म्हणाले.
यामध्ये जखमी झालेले जोडपे अॅलन आणि मार्गारेट हार्डमन यांना थोडेफार खरचटले अाहे. ते यातून लवकरच बरे होऊ शकतात. हे दोघेही 65 वर्षांचे असून युनायटेड स्टेट मध्ये राहतात.
“मला माहित नाही त्या मुलांनी हे कसे केले कसलीच भीती न बाळगता त्यांनी आम्हांला मदत केली”,असे अॅलन हार्डमन म्हणाले.
या फुटबॉल संघाने रॉकी माऊंटन युथ फुटबॉल लीगच्या मोसमात नाबाद राहिले आहे. तर त्यांनी बे एरिया स्प्रिंग फुटबॉल लीग(बीएएसएफएल) जिंकली आहे.
त्यांनी केलेल्या या मदतीमुळे ते मैदानावर आणि मैदानाबाहेरील विजेते ठरले आहेत.
महत्वाच्या बातम्या-
–डेल पोट्रोचा उपांत्य फेरीत राफेल नदालशी रंगणार सामना!
–पहिल्या कसोटी सामन्यात विंडीजची ६ बाद २४६ धावांपर्यंत मजल
–भारतासाठी अफगाणिस्तान कसोटी सामन्यात ही गोष्ट पडू शकते महागात!
–दिप्ती शर्माची जगमोहन दालमिया “बेस्ट वूमन क्रिकेटर ऑफ द इयर” पुरस्कारासाठी निवड
–अकादमीमध्ये इंटरनेटचं स्पीड चांगल नसल्यामुळे या क्रिकेट संघाच्या प्रशिक्षकाचा राजीनामा?