---Advertisement---

विराट-बीसीसीआय विवादात भाजपच्या दिग्गज नेत्याचा नवीनच सुर, सचिनप्रमाणेच ‘या’ क्रिकेटपटूंना भारतरत्न देण्याची मागणी

On: गुरूवार, डिसेंबर 16, 2021 10:36 PM
Virat-Ganguly-&-Shah-BJP-Leader-Subramaniam-Swamy
---Advertisement---

भारतीय क्रिकेटमध्ये सध्या विराट कोहली (Virat Kohli) याची भरपूर चर्चा सुरू आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय, BCCI) येत्या दक्षिण आफ्रिका दौऱ्यापूर्वी (India Tour Of South Africa) अचानक त्याला वनडे संघाच्या नेतृत्त्वपदावरुन (ODI Captaincy) हटवले आहे. त्यानंतर बीसीसीआय अध्यक्ष (BCCI President) सौरव गांगुलीं (Sourav Ganguly)नी दिलेली प्रतिक्रिया आणि विराटने केलेले खुलासे यातून बीसीसीआयमध्ये सध्या सर्वकाही अलबेल नसल्याचे चित्र दिसते आहे. अशातच भारतीय जनता पार्टी (BJP) चे वरिष्ठ नेते सुब्रमण्यम स्वामी (Subramanian Swamy) यांनी मोठे विधान करत सर्वांचेच लक्ष वेधले आहे. 

सध्या चर्चेत असलेल्या रनमशीन विराटला त्यांनी भारतातील सर्वोच्च नागरी पुरस्कार, भारतरत्न (Bharat Ratna Award) देण्याची मागणी केली आहे. 

सोशल मीडियावर सक्रिय राहणाऱ्या सुब्रमण्यम यांनी गुरूवारी (१६ डिसेंबर) संध्याकाळी यासंबंधीचे ट्वीट केले आहेत. ‘जर सचिन तेंडूलकरला भारतरत्न मिळू शकतो, तर विरेंद्र सेहवाग, एमएस धोनी आणि व्हिव्हिएस लक्ष्मण यांनाही भारतरत्न मिळायला पाहिजे,’ असे त्यांनी ट्वीटमध्ये लिहिले आहे.

या ट्वीटला जोडून दुसरे ट्वीट करत त्यांनी, ‘विराट कोहलीलाही भारतरत्न मिळायला हवा’, असे लिहिले आहे.

 

कोहलीसोबत बीसीसीआयमधील कर्मचाऱ्यासारखा व्यवहार करणे चुकीचे
याव्यतिरिक्त बीसीसीआयकडून विराटसोबत केल्या गेलेल्या व्यवहाराबद्दलही ते व्यक्त झाले आहेत. बीसीसीआयने विराटला वनडे संघाच्या नेतृत्त्वपदावरून हटवण्यासंबंधी अधिकृत घोषणा करण्याच्या केवळ काही तासांपूर्वी त्याला सूचना दिली होती. नुकत्याच दिलेल्या एका पत्रकार परिषदेत वनडे कर्णधारपदावरुन काढल्याबद्दल विराट म्हणाला की, ‘मला कसोटी संघाची निवड होण्याच्या दीडतासापूर्वी संपर्क करण्यात आला. माझ्याशी मुख्य निवडकर्त्यांनी कसोटी संघाबद्दल चर्चा केली. त्यावेळी, मला शेवटी सांगितले की मी वनडे संघाचा कर्णधार नसणार आहे आणि मला त्याबद्दल कोणतीही तक्रार नाही. पण, या निर्णयाबद्दल माझ्याशी कोणतीही चर्चा करण्यात आलेली नाही.’

याशिवाय जेव्हा विराटला बीसीसीआयने हा निर्णय का घेतला असे विचारले असता, तो म्हणाला, ‘कारण? नक्कीच आपण कोणतीही आयसीसी स्पर्धा जिंकलेलो नाही. मला त्यांनी हा निर्णय का घेतला, यामागील तर्क मी समजू शकतो.’

यासंबंधी एका ट्वीटवर उत्तर देताना त्यांनी लिहिले की, ‘मी सहमत आहे. विराट कोहली इतका चांगला फलंदाज आहे की, त्याला सचिन तेंडूलकरप्रमाणे भारतरत्न मिळायला पाहिजे. त्याच्यासोबत बीसीसीआय कर्मचाऱ्यासारखे वर्तन करण्याची अजिबात गरज नाहीये.’

सचिनला फार कमी वयात मिळालेला भारतरत्न
सचिनला फेब्रुवारी ४, २०१४ मध्ये भारतरत्न पुरस्कार मिळाला होता. राष्ट्रपती भवनमध्ये भारताचे माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्याद्वारे त्याला या प्रतिष्ठित पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. त्यावेळी सचिन सर्वात कमी वयात हा पुरस्कार मिळवणारा भारतीय बनला होता.

महत्त्वाच्या बातम्या-

‘ऍशेस’ गाजवत असलेल्या वॉर्नरने गाठला विराट, कसोटी क्रमवारीत केली बरोबरी; स्टोक्सच्या हाती मात्र निराशा

धक्कादायक! राष्ट्रीय नेमबाज कोनिका लायकची आत्महत्या, गेल्या ४ महिन्यांतील चक्क चौथी घटना

दक्षिण आफ्रिका क्रिकेटला गालबोट, डिविलियर्स, स्मिथसारख्या दिग्गज खेळाडूंवर गंभीर आरोप

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---