शुक्रवारी (२२ एप्रिल) सकाळी भारतीय संघाचा मीज वेगवान गोलंदाज इरफान पठाणने एक ट्वीट केले, जे खूपच मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले आहे. इरफानच्या या ट्वीटनंतर सोशल मीडियावर अनेक प्रतिक्रिया उमटू लागल्या. इरफानचे हे ट्वीट अपूर्ण असून एकप्रकारे संभ्रम निर्माण करण्याचे काम त्याने केले आहे. अशात भारतीय संघाचा फिरकी गोलंदाज अमित मिश्राने इरफानचे हे ट्वीट पूर्ण करण्याचे काम केले. यानंतर दोघांमधील मतभेत दिसू लागले आहेत.
आयपीएल २०२२ (IPL 2022) हंगामात समालोचकाच्या भूमिकेत दिसणाऱ्या इरफान पठाण (Irfan Pathan) याने अधिकृत ट्विटर खात्यावरून शुक्रवारी म्हणजेच २२ एप्रिलच्या पहाटे ५ वाजून १३ मिनिटांनी हे ट्वीट केले. ट्वीटमध्ये इरफानने लिहिले की, “माझा देश, माझ्या सुंदर देशाकडे जगातील सर्वोत्तम देश बनण्याची क्षमता आहे, पण…” एवढे लिहून इरफानने हे ट्वीट अपूर्ण अवस्थेत सोडले आहे.
https://twitter.com/IrfanPathan/status/1517287833064865792?s=20&t=bdjJOxRrTUHZ6vpjYV7yXw
इरफानच्या या ट्वीनंतर सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगली आहे. इरफानने हे ट्वीट कशाच्या संदर्भात लिहिले आहे, याचा कसलाही उल्लेख किंवा खुलासा केलेला नाहीये. परंतु चाहते त्यांच्या त्यांच्या परीने इरफानच्या या ट्वीटचा अर्ध लावण्याचा प्रयत्न करत आहेत. अशातच अमित मिश्रा (Amit Mishra) याने या चर्चेत उडी घेतली आहे.
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
शुक्रवारी दुपारी १२ वाजून ३८ मिनिटांनी भारतीय संघाचा फिरकीपटू अमित मिश्राने इरफानच्या या अपूर्ण ट्वीटला पूर्ण केले. मिश्राने केलेल्या या ट्वीटवर चाहत्यांच्या वेगवेगळ्या प्रतिक्रिया येत आहेत. काहीजण यासाठी मिश्राचे कौतुक तरत आहेत, तर काहीचे मत मिश्रापेक्षा वेगळे आहे.
मिश्राने लिहिले की, “माझा देश, माझा सुंदर देश, याच्याकडे जगातील सर्वोत्तम देश बनण्याची क्षमता आहे. परंतु फक्त काही लोकांनी हे समजून घेतले पाहिजे की, आपले संविधान ते पहिले पुस्तक आहे, ज्यावर आपण जाणवले केला पाहिजे.” मिश्राच्या या उत्तरानंतर नेटकरी इरफानला ट्रोल करू लागले आहेत. तर काहीजण मिश्राच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित करत आहेत. एका चाहत्याने असेही लिहिले की, अमित मिश्राने इरफान पठाणला क्लीन बोल्ड केले आहे.
https://twitter.com/MishiAmit/status/1517399939910815744?s=20&t=16scIWkzreVQw9YEwwbU0g
सध्या देशात धार्मिक तेढ निर्माण झाल्याचे दिसत आहे. इरफान आणि अमित मिश्राचे ट्वीट देखील याच पार्श्वभूमीवर केले गेले आहेत, असे नेटकरांच्या प्रतिक्रियांवर समजते. असे असले, तरी इरफान पठाणने मात्र मिश्राच्या या उत्तराला अद्याप प्रत्युत्तर दिलेले नाहीये. तसेच, त्याने हे ट्वीट का केले होते, हेदेखील अद्याप स्पष्ट होऊ शकले नाहीये.
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी लिंकवर क्लिक करा
महत्वाच्या बातम्या –
माही मार रहा है! आयपीएलमध्ये ‘असा’ पराक्रम तीन वेळा करणारा धोनी एकमेवच
याला काय अर्थय! धोनी अन् जडेजाच्या ‘या’ २ चुकांमुळे चेन्नईला करावा लागला विजयासाठी संघर्ष





