---Advertisement---

कोरोनाचा बायोबबलमध्ये शिरकाव! हैदराबादच्या वृद्धिमान साहा पाठोपाठ दिल्लीचा ‘हा’ गोलंदाजही कोरोना पॉझिटिव्ह

On: मंगळवार, मे 4, 2021 3:38 PM
---Advertisement---

भारतभरात कोरोना व्हायरसने हाहाकार उडवला आहे. रोज लाखोंनी रुग्ण सापडत आहेत. अशाच सध्या भारतात इंडियन प्रीमीयर लीग २०२१ हंगाम सुरु होता. मात्र, आयपीएलच्या या हंगामालाही जोरदार फटका बसला आहे. अनेक खेळाडू आणि संघाशी निगडीत अन्य सदस्य कोरोनाच्या विळख्यात अडकले आहेत. त्यामुळे अखेर आयपीएलचा हा हंगाम अनिश्चित काळासाठी रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

मागील २ दिवसात कोरोना पॉझिटिव्ह आढळलेल्या खेळाडूंमध्ये आता दिल्लीचा दिग्गज गोलंदाज अमित मिश्राचाही समावेश झाला आहे. दिल्लीचा संघ गेल्या काही दिवसांपासून अहमदाबादमध्ये असून तिथे केलेल्या कोरोना चाचणीदरम्यान मिश्राचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.

अमित मिश्रापूर्वी सनरायझर्स हैदराबादचा यष्टीरक्षक वृद्धिमान साहा, कोलकाता नाईट रायडर्सचे संदिप वॉरियर आणि वरुण चक्रवर्ती, चेन्नई सुपर किंग्स संघाचा गोलंदाजी प्रशिक्षक आणि बस साफ करणारा कर्मचारी हे लोक कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. त्यामुळे कोरोनाने संघांच्या बायोबबलमध्येही प्रवेश केल्याने अखेर आयपीएलचा हा हंगाम रद्द करण्याचा निर्णय ४ मे रोजी घेण्यात आला आहे. तत्पूर्वी ३ मेचा सामनाआधीच रद्द करण्यात आला होता. त्यामुळे २ मेनंतर आयपीएलच्या या हंगामातील सामने झालेले नाहीत.

अमित मिश्राची आयपीएलमध्ये शानदार कामगिरी
आयपीएलमध्ये आत्तापर्यंत अमित मिश्राची कामगिरी शानदार राहिली आहे. त्याने १५४ सामन्यात २३.९७ च्या सरासरीने १६६ विकेट्स घेतल्या आहेत. तो आयपीएलमध्ये लसिथ मलिंगानंतर सर्वाधिक विकेट्स घेणारा दुसऱ्या क्रमांकाचा गोलंदाज आहे. तसेच आयपीएलमध्ये सर्वाधिक वेळा हॅट्रिक घेण्याचा विक्रमही त्याच्याच नावावर आहे. त्याने ३ वेळा आयपीएलमध्ये हॅट्रिक घेतली आहे.

दिल्ली गुणतालिकेत अव्वल
आयपीएल २०२१ हंगाम रद्द होण्यापूर्वी दिल्ली कॅपिटल्स आणि पंजाब किंग्स या दोन संघांचे ८ सामने खेळून झाले होते. तर अन्य ६ संघांचे ७ सामने पूर्ण झाले होते. या सामन्यांनंतर दिल्ली १२ गुणांसह अव्वल क्रमांकावर होते. तर चेन्नई सुपर किंग्स आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर प्रत्येकी १० गुणांसह अनुक्रमे दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकावर होते. तर मुंबई इंडियन्स चौथ्या, राजस्थान रॉयल्स पाचव्या, पंजाब किंग्स सहाव्या, कोलकाता नाईट रायडर्स सातव्या आणि सनरायझर्स हैदराबाद आठव्या क्रमांकावर होते.

महत्त्वाच्या बातम्या –

आयपीएल रद्द!! बीसीसीआयच्या निर्णयाचे फ्रँचायजींकडून स्वागत; खेळाडूंचा जीव महत्वाचा असल्याचं प्रतिपादन

कोरोनाचा आयपीएलला तडाखा! संपूर्ण स्पर्धा तातडीने रद्द; तरीही ‘या’ शहरात पुढील आठवड्यापासून होऊ शकते सुरुवात

बिग ब्रेकिंग! कोरोनामुळे आयपीएल २०२१ चा हंगाम अनिश्चित काळासाठी रद्द

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---