आयपीएल २०२२चा हंगाम चेन्नई सुपर किंग्ज संघासाठी खास राहिलेला नाही. ४ वेळच्या आयपीएल विजेत्या चेन्नई संघाने आतापर्यंत त्यांचे पहिले सलग ३ सामने गमावले आहेत. चेन्नईने कोणत्या आयपीएल हंगामात सुरुवातीचे तिन्ही सामने गमावण्याची ही पहिलीच वेळ होती. त्यामुळे या संघाला भरपूर ट्रोल केले जात आहे. यादरम्यान यंदाच्या हंगामात अनसोल्ड राहिलेल्या अमित मिश्रा यानेही चेन्नई संघावर निशाणा साधला आहे.
मिश्राने (Amit Mishra) चेन्नईला ट्रोल करताना एक ट्वीट (Amit Mishra Trolled CSK) केले आहे. आयपीएलच्या नव्या फ्रँचायझी, गुजरात टायटन्सचे प्रशिक्षक आशिष नेहरा (Ashish Nehra) याचे उदाहरण देत त्याने चेन्नई संघावर निशाणा साधला आहे. त्याने नेहराचा फोटो शेअर केला आहे, जो पंजाब किंग्जविरुद्धच्या सामन्यापूर्वीचा आहे. या फोटोमध्ये नेहरा हातात पेपर घेऊन बसलेला दिसत आहे.
Gujarat Titans are yet to be defeated this season. If they continue the same form, we might see other coaches also giving up laptop and picking up pen and paper like Nehra ji. 😉 #IPL #PBKSvGT #TATAIPL2022 pic.twitter.com/4PdlmnBQnu
— Amit Mishra (@MishiAmit) April 8, 2022
या फोटोच्या कॅप्शनमध्ये त्याने लिहिले आहे की, ‘गुजरात टायटन्सला या हंगामात आतापर्यंत एकाही पराभवाचा सामना करावा लागलेला नाही. जर त्यांनी हाच फॉर्म कायम ठेवला तर, नेहराजींप्रमाणे इतर प्रशिक्षकही लॅपटॉप सोडून पेन आणि पेपर घेऊन बसतील.’
Sorry mate, Still two years younger for it. https://t.co/9rCi5SFIz8
— Amit Mishra (@MishiAmit) April 8, 2022
मिश्राच्या या जबरदस्त ट्वीटवर प्रतिक्रिया देताना एका चाहत्याने लिहिले आहे की, ‘सर तुम्ही कृपया चेन्नई संघात सहभागी व्हा.’ या चाहत्याच्या ट्वीटवर प्रत्युत्तर देताना मिश्राने मजेशीर प्रतिक्रिया दिली आहे. मिश्राने लिहिले आहे की, ‘माफ कर भावा. चेन्नईत सहभागी होण्यासाठी मी अजून २ वर्षांनी युवा आहे.’
Sorry mate, Still two years younger for it. https://t.co/9rCi5SFIz8
— Amit Mishra (@MishiAmit) April 8, 2022
अमित मिश्रा यंदा राहिला अनसोल्ड
दरम्यान मिश्रा यंदाच्या हंगामात अनसोल्ड राहिला आहे. त्याची मूळ किंमत १ कोटी ५० लाख असल्याने त्याच्यावर एकाही संघाने बोली लावलेली नाही. मिश्रा आयपीएलमधील सर्वात यशस्वी फिरकीपटूंपैकी एक आहे. आयपीएलमध्ये ३ हॅट्रिक घेण्याचा पराक्रम त्याच्या नावावर आहे.
त्याने आतापर्यंत १५४ आयपीएल सामने खेळताना १६६ विकेट्स घेतल्या आहेत. तो आयपीएलमध्ये सर्वाधिक विकेट्स घेणारा तिसरा गोलंदाज आहे. त्याच्यापूर्वी ड्वेन ब्रावो आणि लसिथ मलिंगा या यादीत पहिल्या २ क्रमांकावर आहेत.
महत्त्वाच्या बातम्या-
‘कौतुक करावे तेवढे कमीच’, हार्दिक पंड्या ‘मॅचविनर’ राहुल तेवतियावर भलताच खुश
“आम्ही १००% त्याच्यासोबत आहोत…”, सामन्यात ‘व्हिलन’ बनलेल्या गोलंदाजाला मयंक अगरवालचा भक्कम पाठिंबा