बॉलिवूडचे सुपरस्टार महानायक अमिताभ बच्चन हेदेखील कोरोना व्हायरसच्या विळख्यात सापडले आहेत. त्यांनी ११ जुलैच्या रात्री स्वत: कोरोना पॉझिटिव्ह असल्याची माहिती ट्विटरवरून दिली असता, त्यांच्या चाहत्यांना एकप्रकारे मोठा धक्काच बसला आहे. आता संपूर्ण जगभरातून ते लवकर बरे होण्यासाठी प्रार्थना केली जात आहे. अशामध्येच पाकिस्तानचा माजी कर्णधार शाहिद आफ्रिदीनेही आपली प्रतिक्रिया दिली आहे.
आफ्रिदीने (Shahid Afridi) ट्वीट करत म्हटले, “अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) आणि अभिषेक बच्चन (Abhishek Bachchan) यांच्यासाठी मी प्रार्थना करतो. अपेक्षा आहे की तुम्ही लवकरात लवकर बरे व्हाल.”
पाकिस्तानातून केवळ आफ्रिदीनेच नव्हे तर माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तरनेही (Shoaib Akhtar) बिग बी यांच्यासाठी प्रार्थना केली आहे. रावळपिंडी नावाने प्रसिद्ध असलेल्या अख्तरने ट्वीट करत म्हटले होते, “अमिताभजी आपण लवकर बरे व्हा.”
अमिताभ बच्चन यांच्यासहित त्यांचा मुलगा अभिषेक बच्चन, सून ऐश्वर्या राय बच्चन (Aishwarya Rai Bachchan) आणि नात आराध्यादेखील (Aaradhya) कोरोना पॉझिटिव्ह (Corona Positive) आढळले आहेत. अमिताभ हे मुंबईच्या नानावटी रुग्णालयात दाखल आहेत, तर अभिषेक शेजारच्या खोलीत ऍडमिट आहे. ऐश्वर्या आणि आराध्या या मायलेकींना होम क्वारंटाईन करण्यात आले आहे.