भारताने मंगळवारी (१६ फेब्रुवारी) इंग्लंडविरुद्ध दुसऱ्या कसोटी सामन्यात ३१७ धावांनी विजय मिळवला. एमए चिदंबरम स्टेडियमवर पार पडलेल्या या सामन्यात भारताने दिलेल्या ४८२ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना इंग्लंडला दुसऱ्या डावात १६४ धावाच करता आल्या. या विजयानंतर, प्रसिद्ध बॉलीवूड अभिनेते अमिताभ बच्चन यांनी ट्विट करत भारतीय संघाचे अभिनंदन केले. या ट्विटमध्ये त्यांनी इंग्लंडचा कर्णधार जो रूटची मजा घेतली आहे.
भारतीय संघाचा चेन्नई कसोटीत विजय
भारतीय संघाने दुसऱ्या कसोटीत नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला होता. सलामीवीर रोहित शर्माने १६१ धावांची खेळी केल्याने भारतीय संघ ३२९ धावांपर्यंत मजल मारू शकला. रविचंद्रन अश्विनने ५ विकेट्स घेत इंग्लंडचा पहिला डाव १३४ धावांवर गुंडाळण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. पहिल्या डावातील १९५ धावांच्या आघाडीनंतर भारतीय संघाने दुसर्या डावात अश्विनच्या शतकामुळे २८६ धावा फलकावर लावल्या. चौथ्या डावात इंग्लंडला विजयासाठी ४८२ धावांचे आव्हान देण्यात आले. जे त्यांना पार करण्यात अपयश आले आणि भारताने मोठा विजय मिळवला. सामनावीर म्हणून रविचंद्रन अश्विनची निवड करण्यात आली.
अमिताभ यांनी केले भारतीय संघाचे अभिनंदन
भारतीय संघाच्या विजयानंतर अमिताभ बच्चन यांनी ट्विट करून विजयी संघाचे अभिनंदन केले. बच्चन यांनी लिहिले,’भारतीय संघाचा ३१७ धावांनी विजय. कसोटीत ३१७ धावा म्हणजे खूप आहेत.. हे अविश्वसनीय आहे. मुळे (रूट) तर आम्ही केव्हाच काढून टाकली दिली होती आता सुकवायला पण घातली आहेत..’ अमिताभ यांचे हे ट्विट सध्या प्रचंड व्हायरल होत आहे.
T 3816 – Yeeeeeaaaaahhhh and YEEEEAAAAAHHHHH !
India Wins by 317 runs .. I mean 317 runs in a Test .. that is INCREDIBLE !
जड़ें तो पहले ही उखाड़ दी थीं ; अब उन्हें उखाड़ के सुखा भी दिया है !
INDIA INDIA INDIA !!! ???????????????????????????????????????????????????????????????????????????????? pic.twitter.com/SnDTNQxsKH— Amitabh Bachchan (@SrBachchan) February 16, 2021
क्रिकेटप्रेमी आहेत अमिताभ
अमिताभ बच्चन हे अभिनयासोबत क्रिकेटप्रेमी म्हणून प्रसिद्ध आहेत. अनेकदा ते भारतीय संघाच्या सामन्यांना किंवा आयपीएलच्या सामन्याला हजेरी लावताना दिसून येतात. पहिल्या कसोटी सामन्यावेळी इंग्लंडचा माजी कर्णधार ऍण्ड्रू फ्लिंटॉफ यांच्यासोबत त्यांचे ‘ट्विटर वॉर’ रंगले होते. फ्लिंटॉफने अमिताभ यांचे २०१६ मधील ट्विट कोट करत त्यांची मजा घेतली होती.
फ्लिंटॉफ आणि अमिताभ यांचे ट्विटर वॉर –
इंग्लंडचा संघ २०१६ साली जेव्हा भारत दौऱ्यावर आला होता तेव्हा ऍण्ड्रू फ्लिंटॉफ विराट कोहलीच्या बाबतीत ट्विट करताना म्हटले होते, “असाच खेळत राहिला तर, एक दिवस विराटदेखील रूट इतका उत्तम बनेल.” त्यावर अमिताभ बच्चन यांनी म्हटले होते की, “कोण आहे हा रूट ? मुळापासून उपटून टाकू या रूटला.”
यानंतर ५ वर्षांनी पुन्हा इंग्लंडचा संघ भारत दौऱ्यावर आला. यावेळी पहिल्या कसोटी सामन्यात रुटने द्विशतकी खेळी साकारत इंग्लंडच्या विजयात महत्त्वाचा वाटा उचलला. यानंतर फ्लिंटॉफ याने अमिताभ बच्चन यांचे २०१६ मधील ट्विट रिट्विट करत, बच्चन यांच्या पाच वर्षांपूर्वीच्या प्रश्नाचे उत्तर दिले. त्याने ट्विट केले की “मी तुमचा सन्मान करतो पण, काळानुसार हे बरोबर लागू झालं.”
With the greatest respect , this aged well ???? https://t.co/sjhs7HGT1d
— Andrew Flintoff (@flintoff11) February 6, 2021
यानंतर आता पुन्हा अमिताभ यांनी भारताच्या विजयानंतर ट्विट काढत एकप्रकारे फ्लिंटॉफला चिमटा काढला आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
भारतीय संघाने येऊ दिली नाही रूटची ‘सत्ता’, मोठ्या विक्रमापासून ठेवले वंचित
पदार्पणात बळींचा पंचक, अखेर ४२ वर्षांनंतर अक्षरने संपवली ही प्रतिक्षा; ठरला दुसराच डावखुरा स्पिनर






