---Advertisement---

‘अन् या डिलिव्हरीने थेट बोल्ड’, खास कार्टून प्रसिद्ध करत अमूलकडून विरूष्काला शुभेच्छा; पाहा फोटो

On: गुरूवार, जानेवारी 14, 2021 3:26 PM
---Advertisement---

ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारत यांच्यातील कसोटी मालिकेबरोबरच सध्या भारताचा नियमित कर्णधार विराट कोहली आणि त्याची पत्नी प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा यांच्या पहिल्या बाळाची देखील जोरदार चर्चा सुरु आहेत. अनुष्काने ११ जानेवारीला मुंबईत मुलीला जन्म दिला. तेव्हापासून चाहत्यांमध्ये त्यांच्या या पहिल्या मुलीची चर्चा होताना दिसून येत आहे. तसेच विराट आणि अनुष्काला अनेक सेलिब्रेटिंनी देखील शुभेच्छा दिल्या आहेत. याबरोबरच आता अमुलने देखील त्यांच्या मुलीच्या जन्मानिमित्त एक कार्टून प्रसिद्ध केले आहे.

विराट आणि अनुष्का पाळण्यात असलेल्या बाळाला खेळवत असल्याचे हे कार्टून आहे. तसेच त्यात लिहिले आहे की ‘या डिलेव्हरीने त्रिफळाचीत केले. घरी स्वागत आहे.’

अमुल हे ताज्या घडामोडींच्या विविध विषयांवर कार्टुन बनवत असतात. त्यामुळे यावेळी त्यांनी विराट आणि अनुष्काच्या बाळाच्या जन्माबद्दल कार्टुन काढले आहे.

विराटने सोशल मीडियावर पोस्ट करत दिली होती मुलीच्या जन्माची बातमी –

विराटने सोशल मीडियावर पोस्ट करत मुलीच्या जन्माबद्दल माहिती दिली होती. त्याने ११ जानेवारीला पोस्ट करत म्हटले होते की, ‘आम्हाला सोमवारी दुपारी मुलगी झाली आहे. आम्ही सर्वांनी दिलेल्या प्रेमाचे आणि शुभेच्छांबद्दल आभार मानतो. अनुष्का आणि बाळाचे आरोग्य उत्तम आहे. आम्ही आमच्या आयुष्यातील या नवीन पर्वाची सुरुवात करण्यास उत्सुक असून आमच्या खाजगी जीवनाचा आदर राखला जाईव अशी अपेक्षा करतो.’

विराटने घेतली पालकत्व रजा – 

विराटने काही दिवसांपूर्वीच आपल्या बाळाचे आगमन होणार असल्याने पालकत्व रजा बीसीसीआयकडून मंजूर करुन घेतली होती. त्यामुळे तो ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील वनडे, टी२० मालिका आणि कसोटी मालिकेतील पहिला सामना खेळून भारतात परतला होता.

काही महिन्यांपूर्वी दिली होती गोड बातमी –

विराट आणि अनुष्काने ऑगस्ट २०२० मध्ये सर्वांना त्यांच्या घरी नवीन पाहुणा येणार असल्याची गोड बातमी दिली होती. त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत सांगितले होते की जानेवारी २०२१ मध्ये ते दोघेही पहिल्यांदाच आई-बाबा होणार आहेत.

इटलीमध्ये झाले लग्न – 

विराट आणि अनुष्काने इटलीमध्ये १० डिसेंबर २०१७ रोजी लग्नगाठ बांधली होती. त्यावेळी त्यांच्या लग्नसोहळ्यात जवळचे नातेवाईक आणि मित्रपरिवास सहभागी झाला होता.

मुली असणाऱ्या क्रिकेटपटूंच्या क्लबमध्ये सामील – 

सध्या अनेक क्रिकेटपटूंना कन्यारत्न झाले आहे. त्यामुळे आता विराटही कन्यारत्न असलेल्या क्रिकेटपटूंच्या क्लबमध्ये सामील झाला आहे. या क्लबमध्ये एमएस धोनी, उमेश यादव, गौतम गंभीर, अजिंक्य रहाणे, चेतेश्वर पुजारा, आर अश्विन, सुरेश रैना, सौरव गांगुली, रविंद्र जडेजा, रोहित शर्मा अशा अनेक क्रिकेटपटूंचा समावेश आहे.

महत्त्वाच्या बातम्या – 

AUS v IND : कुठे व केव्हा होणार चौथा कसोटी सामना, जाणून घ्या सर्वकाही

हॉटेलच्या खोलीत येताच आर अश्विन लागला होता रडायला, पत्नीचा खुलासा

‘मला धक्काच बसला’, पंतचा बॅटींग मार्क पुसण्याच्या आरोपानंतर स्टीव्ह स्मिथची प्रतिक्रिया

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---