भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील दुसरा कसोटी सामना रविवारी (19 फेब्रुवारी) निकाली निघाला. मालिकेतील सलग दुसरा कसोटी सामना रोहित शर्मा याच्या नेतृत्वातील भारताने नावावर केला. दिल्ली कसोटीत संघाला विजय मिळवून देण्यासाठी रविंद्र जडेजा इतकेच महत्वाचे योगदान रविचंद्रन अश्विन याने दिले. सोशल मीडियावर सध्या एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. व्हिडिओत अश्विनने लाईव्ह सामन्यात केलेल्या एका कृत्यामुळे विराट कोहली जोरजारात हसताना दिसत आहे.
भारत आणि ऑस्ट्रेलिया (IND vs AUS) यांच्यातील बॉर्डर गावसकर ट्रॉफीचा पहिला सामना नागपूरच्या विदर्भ क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर खेळला गेला. उभय संघांतील या सामन्यात भारताने एक डाव आणि 132 धावांनी विजय मिळवला. मालिकेतील दुसरा सामना दिल्लीत खेळला गेला असून रविवारी (19 फेब्रुवारी) भारताने 6 विकेट्स राखून या सामन्यातही विजय मिळवला. बॉर्डर गावसकर ट्रॉफी 2023मध्ये भारत सध्या 2-0 अशा आघाडीवर आहे.
दिल्ली कसोटीच्या तिसऱ्याय दिवसी रविचंद्रन अश्विन (Ravichandran Ashwin) याने लाईव्ह सामन्यात असे काही केले, ज्यामुळे मैदानात विराट कोहली खळखळून हसताना दिसला. ऑस्ट्रेलियन संघचा दुसरा डावात दिल्ली कसोटीच्या तिसऱ्या दिवशी संपला आणि भारताने हा सामना तिसऱ्याच दिवसी जिंकला देखील. ऑस्ट्रेलियाच्या दुसऱ्या डावातील 15 वे षटक टाकण्यासाठी अश्विन आळा होता. षटकातील चार चेंडू झाले होते आणि पाचवा चेंडू खेळण्यासाठी स्ट्राईकवर मार्नस लाबुशेन (Marnus labhuchagne) तयार होता. अश्विन चेंडू टाकण्यासाठी धावात आला, पण त्याने चेंडू सोडला नाही.
अश्विनने यापूर्वीही असे अनेकदा केले आहे. पण यावेळी त्याने नॉन स्ट्राईकवरील फलंदाजाला बात करण्यासाठी प्रयत्न केला नाही. अश्विनने फक्त या क्षणाचा आनंद घेतला. स्ट्राईकवरील लाबुशेन आणि नॉन स्ट्राईकवरील स्टीव स्मिथ (Steve Smith) हे दोघेही यावेळी हसताना दिसले. मैदानात क्षेत्ररक्षणासाठी उभा असलेला विराट कोहली (Virat Kohli) जोरजारात टाळ्या वाजवून हसत होता. या प्रसंगाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर सर्वत्र व्हायरल होत आहे.
https://twitter.com/O1234OOOO/status/1627189332795879424?s=20
दरम्यान, उभय संघांतील या सामन्याचा एकंदीरत विचार केला तर नाणेफेक गमावल्यानंतर भारताने प्रथम गोलंदाजी केली आणि ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव 263 धावांवर गुंडाळला. त्यानंतर भारताने त्यांच्या पहिल्या डावात 262 धावा केल्या. दुसऱ्या डावात ऑस्ट्रेलियान संघ अवघ्या 113 धावांवर गुंडाळला गेला. फिरकीपटू रविचंद्रन अश्विनने तीन, तर रविंद्र जडेजाने दुसऱ्या डावात ऑस्ट्रेलियाच्या सात विकेट्स घेतल्या. प्रत्युत्तरात भारताला विजयासाठी 115 धावाचे लक्ष्य मिळाले, हे 4 विकेट्सच्या नुकसानावर भारतीय संघाने गाठले. (An act by Ravichandran Ashwin makes Virat Kohli laugh )
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
भारताकडे सेमीफायनलमध्ये जागा बनवण्याची शेवटची संधी, जाणून घ्या कशी असू शकते प्लेइंग इलेव्हन
लागोपाठ दोन पराभवाने ऑस्ट्रेलिया संघात भूकंप, कर्णधार मायदेशी परतला, आता पुढे काय? वाचा सविस्तर





