---Advertisement---

शानदार… जबरदस्त… जिंदाबाद…! टीम इंडियावर आजी-माजी दिग्गजांकडून पडतोय कौतुकाचा पाऊस

On: शनिवार, जानेवारी 1, 2022 9:03 AM
Team India
---Advertisement---

दक्षिण अफ्रिका दौऱ्याची (India tour of South Africa) सुरुवात भारतीय संघासाठी चांगली झाली आहे. दक्षिण अफ्रिकेविरुद्धचा पहिला कसोटी सामना भारताने ११३ धावांनी जिंकला आहे. हा सामना सेंचुरियनमध्ये खेळला गेला आणि भारताने सेंचुरियमध्ये जिंकलेला हा पहिलाच कसोटी सामना ठरला आहे. या विजयानंतर भारतीय संघाचे आजी-माजी खेळाडूंकडून कौतुक करण्यात आले.

महान फलंदाज सचिन तेंडुलकरने ट्वीट करून भारतीय संघाचे कौतुक केले. त्याचसोबत व्हीव्हीएस लक्ष्मण आणि विरेंद्र  सेहवाग यांच्यासारख्या खेळाडूंनी देखील संघाचे कौतुक केले आहे.

सचिन तेंडुलकरने ट्वीटमध्ये लिहिले की, “जगात कुठेही कसोटी सामन्यात २० विकेट्स घेण्याची क्षमता ठेवणाऱ्या आक्रमणाने उत्कृष्ट गोलंदाजी केली. अप्रतिम विजयासाठी भारतीय संघाचे अभिनंदन.”

भारतीय संघाचे माजी प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी कर्णधार विराट कोहली आणि नवीन प्रशिक्षक राहुल द्रविड यांचे या विजयासाठी कौतुक केले. शास्त्री म्हणाले की, “वाह, ब्रिस्बेन, ओवल, लॉर्ड्स आणि आता सेंचुरियन.. अभिनंदन कोहली, राहुल द्रविड. सेंचुरियनमध्ये जिंकणारा पहिला आशियाई संघ बनल्यावद्दल संपूर्ण संघाचे अभिनंदन.’

भारतीय संघाचे माजी क्रिकेटपटू लक्ष्मणने लिहिले की, “वर्षाची सुरुवात सिडनीमध्ये संघर्षाने झाली, पण त्यानंतर गाबामध्ये एक अविश्वसनीय विजय मिळवणे अप्रतिम होते. लॉर्ड्सवरील विजय खास होता आणि भारताने वर्षाच्या शेवटी सेंचुरियनमध्ये अप्रतिम विजययाने केला. भारतीय संघासाठी कसोटी क्रिकेटचे चांगले वर्ष राहिले आहे. उत्कृष्ट विजयासाठी शुभेच्छा.”

याचसोबत भारताचा माजी सलामीवीर फलंदाज विरेंद्र सेहवागने देखील संघाचे कौतुक केले. सेहवागने लिहिले की, “२०२१ कसोटी क्रिकेटमध्ये भारतीय संघासाठी अविस्मरणीय राहिले आहे. गाबा, लॉर्ड्स, ओवल, सेंचुरियनमध्ये विजयासह सिडनीमध्ये सामना अनिर्णीत करण्यासाठी केलेला अद्भुत संघर्ष कोण विसरू शकतो. भारतीय संघाला सुखद आणि यापेक्षा चांगल्या २०२२ साठी शुभेच्छा”

दक्षिण अफ्रिकेविरुद्ध पहिल्या सामन्यात विजय मिळवल्यानंतर भारताने कसोटी मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे. भारतीय संघाने दक्षिण अफ्रिकेत आतापर्यंत एकही कसोटी मालिका जिंकली नाहीय. अशात विराट कोहलीच्या नेतृत्वातील भारतीय संघाकडे कसोटी मालिका जिकून इतिहास रचण्याची सुवर्णसंधी आहे.

महत्वाच्या बातम्या –

‘मी खूप भाग्यवान की, सचिनसारखा मित्र मिळाला’, कांबळीने शेअर केला मैत्रीचे उदाहरण देणारा व्हिडिओ

क्रिकेट ऑस्ट्रेलियाने निवडली २०२१ वर्षातील सर्वोत्तम कसोटी ‘प्लेइंग इलेव्हन’, ‘या’ ४ भारतीयांना दिले स्थान

संघसहकारीच म्हणतोय, ‘तुझी जीभ खूप चालतेय सूर्या’; वाचा सविस्तर

व्हिडिओ पाहा –

क्रिकेटमधील डक अन् त्याचे प्रकार | Explanation Of Duck In Cricket And Its Type

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---