भारतीय संघाला श्रीलंका दौऱ्यावर एकदिवसीय मालिकेत अपयश आलं. भारत आणि श्रीलंका यांच्यामध्ये 3 सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळली गेली. त्यामध्ये श्रीलंकेनं 2-0 नं ही मालिका जिंकली. पहिला सामना बरोबरीत सुटला होता, तर दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात श्रीलंकेनं विजय मिळवला. तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात श्रीलंकेनं भारताचा 110 धावांनी दारुण पराभव केला. तत्पूर्वी ही मालिका गमावल्यानंतरही एका भारतीय चाहत्यानं कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि श्रेयस अय्यरकडे (Shreyas Iyer) आगामी चॅम्पियन्स ट्राॅफीबाबत एक खास गोष्ट मागितली आहे. ज्यामुळे दोन्ही खेळाडू फक्त बघत चाहत्याकडे बघत होते.
2024च्या टी20 विश्वचषकानंतर आता भारतीय संघाचं लक्ष आगामी चॅम्पियन्स ट्राॅफीवर लागलं असेल. भारतानं शेवटची चॅम्पियन्स ट्राॅफी 2013 मध्ये महेंद्रसिंह धोनीच्या (Mahendra Singh Dhoni) नेतृत्वाखाली जिंकली होती. त्यावेळी भारतानं इंग्लंडचा धुव्वा उडवला होता. शेवटची चॅम्पियन्स ट्राॅफी 2017 मध्ये खेळवली गेली होती. त्यावेळी भारताला फायनलमध्ये पाकिस्तानकडून पराभवाचा सामना करावा लागला होता.
तत्पूर्वी चॅम्पियन्स ट्राॅफीपूर्वी एक भारतीय चाहता रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि श्रेयस अय्यरकडे (Shreyas Iyer) चॅम्पियन्स ट्राॅफी जिंका. अशी मागणी करत आहे. दरम्यान हा व्हिडिओ तेव्हाचा आहे ज्यावेळी रोहित आणि अय्यर मुंबई विमानतळावरुन कोलंबोला जाण्यासाठी निघाले होते. त्यावेळी एक चाहता अय्यरला म्हणतो की, “सर आता चॅम्पियन्स ट्राॅफी जिंकायची आहे फक्त चॅम्पियन्स ट्राॅफी” रोहित शर्मा आणि श्रेयस अय्यर दोघं एकमेकाकडे बघतात आणि हसायला लागतात.
A few days back when captain Rohit and Shreyas Iyer were going to Colombo from Mumbai airport
Fan to Iyer – Sir Abhi CT jeetna he bas CT sir 😂
Iyer – Sir CT…😂 and both Rohit and Iyer started laughing.😂 pic.twitter.com/svMbGVau76
— 𝐑𝐮𝐬𝐡𝐢𝐢𝐢⁴⁵ (@rushiii_12) August 9, 2024
श्रीलंकेविरुद्धच्या झालेल्या एकदिवसीय मालिकेबद्दल बोलायचं झालं तर दोन्ही संघांमध्यै 3 एकदिवसीय सामने खेळले गेले. त्यामध्ये भारतीय संघ एकही सामना जिंकू शकला नाही. श्रीलंकेनं घरच्या मैदानावर भारताचा धुव्वा उडवला आणि इतिहास रचला. श्रीलंकेनं भारताला 27 वर्षांनंतर एकदिवसीय मालिकेत पराभूत केलं. रोहित शर्मा (Rohit Sharma) श्रीलंकेविरुद्ध एकदिवसीय मालिका गमावणारा तिसरा भारतीय कर्णधार ठरला.
महत्त्वाच्या बातम्या-
टोकियो ते पॅरिस… गोल्ड आणि सिल्वर! नीरज चोप्रा कसा बनला ऑलिम्पिकमधील भारताचा सर्वात मोठा ॲथलीट?
युवराज सिंगचा शिखर धवन सोबत “चीन, टपक, डम डम”, पाहा मजेशीर VIDEO
नीरज चोप्रा फायलनमध्ये दुखापतीसह खेळत होता, उघड केलं मोठं गुपित!