---Advertisement---

ब्रायडन कार्सच्या नावावर नकोसा रेकाॅर्ड! 148 वर्षे, 3 महिने आणि 20 दिवसांनी घडली ‘ही’ घटना

On: शनिवार, जुलै 5, 2025 6:30 PM
---Advertisement---

Brydon Carse: ब्रायडन कार्स इंग्लंड क्रिकेट संघाचा हा नवा वेगवान गोलंदाज सध्या भारताविरुद्धच्या कसोटी मालिकेचा भाग आहे. कारकिर्दीत केवळ 7 सामने खेळलेल्या कार्सच्या नावावर कसोटी क्रिकेटचा एक नकोसा रेकाॅर्ड नोंदवला गेला आहे. तो भारताविरुद्ध एजबॅस्टन कसोटीच्या पहिल्या डावात फलंदाजीसाठी उतरला तेव्हा त्याला खातेही उघडता आले नाही. त्याला मोहम्मद सिराजने शून्यावरच पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला. तो बाद होताच क्रिकेट इतिहासाच्या विकेट यादीत त्याचे नाव अशा ठिकाणी नोंदवले गेले, जे कोणताही खेळाडू करू इच्छित नाही. (Brydon Carse Test duck record)

खरं तर, उजव्या हाताने वेगवान गोलंदाजी करणारा ब्रायडन कार्स कसोटी इतिहासातील 10,000 वा ‘डक’ म्हणजेच शून्यावर बाद होणारा फलंदाज ठरला आहे. एजबॅस्टन कसोटीच्या तिसऱ्या दिवशी हा निराशाजनक रेकाॅर्ड त्याच्या नावावर नोंदवला गेला आहे. कार्स कसोटी क्रिकेटच्या इतिहासातील हा 10,000 वा ‘डक’ ठरला आहे. ही आकडेवारी पूर्ण होण्यास 148 वर्षे, 3 महिने आणि 20 दिवस लागले. (Brydon Carse Test duck record)

भारत आणि इंग्लंड यांच्यात सुरू असलेल्या दुसऱ्या कसोटीत ब्रायडन कार्स इंग्लंडसाठी 9 व्या क्रमांकावर फलंदाजीसाठी आला होता. त्याच्यापूर्वी याच सामन्यात बेन डकेट, ओली पोप, बेन स्टोक्स, जॉश टंग आणि शोएब बशीर हे देखील खाते उघडू शकले नव्हते. आता कसोटी क्रिकेटमध्ये एकूण 10,002 ‘डक’ (शून्य) नोंदवले गेले आहेत. दरम्यान इंग्लंड असा पहिला संघ बनला आहे, ज्याने एका डावात 400 पेक्षा जास्त धावा केल्या आणि त्याचे 6 खेळाडू खातेही उघडू शकले नाहीत. 148 वर्षांच्या क्रिकेट इतिहासात असे कधीही घडले नव्हते. (10000th duck in Test cricket history)

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---