भारतीय संघाचा माजी कर्णधार एमएस धोनी गुरुवारी (७ जुलै) त्याचा ४१ वा वाढदिवस साजरा करत आहे. धोनीचे जगभरातील चाहतेही त्याला वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देत आहेत. सोशल मीडियावर धोनीचे नाव ट्रेंडिंगला आहे आणि चाहते त्याच्याविषयी वेगवेगळ्या पोस्ट शेअर करत आहेत. या यादीत भारताचा दिग्गज उध्योगपती आनंद महिंद्रा यांचाही समावेश आहे.
आनंद महिंद्र (Anand Mahindra) सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असतात. त्यांनी स्वतःच्या अधिकृत ट्वीटर खात्यावरून धोनीच्या वाढदिवसानिमित्त पोस्ट केली आहे. क्रिकेटचे मोठे चाहते मानले जाणाऱ्या आनंद महिंद्रांनी ट्वीटमध्ये लिहिले की, “वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा एमएस धोनी (MS Dhoni). ही एक वेळा आहे की, तू शतकाच्या जवपासही जाऊ नये असे माल वाटत आहे.” या पोस्टच्या माध्यमांतून आनंद महिंद्रांना असे म्हणायचे आहे की, धोनीने अशाच प्रकारे तरूण राहावे.
Many Happy Returns of the Day, MS. This is one time I don’t want you to get anywhere near a century! 😊 #MSDhoni
— anand mahindra (@anandmahindra) July 7, 2022
दरम्यान, आनंद महिंद्रांचे क्रीडाजगताशी खूप जवळचे नाते सांगितले जाते. ते खेळाडूंच्या चांगल्या प्रदर्शनासाठी आणि कामगिरीनिमित्त नेहमीच ट्वीटरवर व्यक्त होत असतात. त्यांची कंपनी ‘महिंद्रा एँड महिंद्रा’ ऑलिम्पिक पदक जिंकणाऱ्या खेळाडूंना सन्मानित करण्यासाठी गाड्या बक्षीस दिल्या होत्या. तसेच मोठा रोख रक्कमही बक्षीस म्हणून दिली आहे.
दरम्यान, धोनीने १५ ऑगस्ट, २०२२ रोजी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे, परंतु आयपीएलमध्ये तो अजूनही चेन्नई सुपर किंग्जचा कर्णधार आहे. मागच्या वर्षी त्याने सीएसकेचे नेतृत्व सोडले होते, पण जडेजा कर्णधारपदाचा भार पेतला आला नसल्यामुळे त्याला पुन्हा एकदा कर्णधार बनवले गेले.
धोनी सध्या ४१ वर्षाचा झाला असला तरी, अजूनही तो पूर्णपणे फिट आहे. याच कारणास्तव यष्टीपाठी आजही त्याच्या तोडीस तोड कोणी भारतीय संघात आला नाहीये. यष्टीरक्षाच्या भूमिकेत तो उत्कृष्ट प्रदर्शन करू शकतोच, पण कर्णधारपदाच्या बाबतीत देखील सध्या त्याची बरोबरी कोणी करू शकणार नाही. जगभरातील दिग्गज आजही धोनीला एक सर्वोत्कृष्ट कर्णधार मानतात.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या –
वेस्ट इंडीज विरुद्धच्या मालिकेसाठी शिखर धवन कर्णधार! चाहते नाराज, बीसीसीआयला केलं ट्रोल
रणजी ट्रॉफी गाजवणारा ‘तो’ खेळाडू टीम इंडियामध्ये यायलाच हवा, भारतीय दिग्गजाने केली मागणी
प्रतीक्षा संपली! अखेर भारत पाकिस्तान लवकरच भिडणार, वाचा कधी आणि कुठे होणार सामना