---Advertisement---

प्रसिद्ध भारतीय उद्योगपतीही झाला सॅम करनचा फॅन, कौतूक करताना म्हणाला…

---Advertisement---

भारतीय क्रिकेट संघाने रविवारी इंग्लंडविरुद्ध वनडे मालिकेत शानदार विजय मिळवत मालिका २-१ अशी खिशात घातली. पुण्यातील महाराष्ट्र क्रिकेट असोशिएशनच्या स्टेडियमवर हा सामना झाला. भारताने कसोटी, टी२० मालिकेत यापुर्वीच विजय मिळविल्यामुळे इंग्लंड संघाला खालीहात मायदेशी परतावे लागले. याच मालिकेत इंग्लंड संघासाठी कोणती गोष्ट जर चांगली ठरली असेल तर २२ वर्षीय सॅम करनला संघात पुन्हा स्थान देणे होय. त्याने आपल्याला मिळालेल्या संधीचा पुरेपुर फायदा या मालिकेत केला. याचमुळे त्याचे कौतूक भारतातील एका दिग्गज उद्योगपतीलाही करावे लागले.

भारत विरुद्ध इंग्लंड वनडे मालिकेतील शेवटच्या सामन्यात सॅम करनने सलामीला गोलंदाजी करताना ५ षटकांत एक विकेट घेतली व फलंदाजीत त्याने ८३ चेंडूत शानदार नाबाद ९५ धावांची खेळी केली. इंग्लंड संघ पराभूत होऊनही त्याला सामनावीर पुरस्काराने गौरविण्यात आले. यानंतर त्याने एक ट्विट केला होता. ज्यात त्याने ‘खपू काही शिकायला मिळाले. असामान्य क्रिकेट मालिका. भारतीय संघाचे अभिनंदन’ असे लिहीले होते.

यावर प्रसिद्ध उद्योगपती आनंद महिंद्रा यांनी ट्विट कोट करत रिप्लाय दिला आहे. ‘जर तुम्ही विरता, विन्रमता व संयमाचे उदाहरण पाहात असाल तर…’ असा रिप्लाय त्यांनी केला आहे. आनंद महिंद्रा हे अनेक वेळा ट्विटरच्या माध्यमातून व्यक्त होत असतात. तसेच ते क्रिकेटचे निसिम्म चाहते आहे. युवा क्रिकेटपटूंचे मनोबल वाढविण्यात ते नेहमी अग्रेसर असतात. केवळ क्रिकेटचं नाही तर अन्य खेळाडूंनाही ते सतत पाठींबा देतात. यावेळी त्यांनी इंग्लंडच्या या युवा खेळाडूचे चांगलेच मनोबल वाढविले आहे.

यापुर्वी आनंद महिंद्रा यांनी ऑस्ट्रेलिया मालिकेत चांगली कामगिरी केलेल्या ६ युवा क्रिकेटपटूंना थार गाडी भेट दिली होती.

सॅम करनची क्रिकेट कारकिर्द-

२२ वर्षीय सॅम करनने १९व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. २०१८ सालापासून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळत असलेल्या या युवा क्रिकेटपटूने २१ कसोटी, ८ वनडे व १३ टी२० सामने खेळले आहेत. त्याच्या नावावर कसोटीत ७४१ वनडेत १३२ व टी२० मध्ये ६६ धावा आहेत. तसेच गोलंदाजी करताना त्याने कसोटीत ४४, वनडेत ७ व टी२०मध्ये ११ विकेट्स घेतल्या आहेत.

महत्त्वाच्या बातम्या-

भारतात होणाऱ्या टी२० विश्वचषकात एबी डिवीलियर्स खेळणार का? या प्रश्नाचे उत्तर अखेर मिळालेच!

Video: खेळाडूने एकअंगी डाइव्ह मारत घेतला भन्नाट झेल, फलंदाजांची रिऍक्शन होती बघण्यासारखी

आयपीएलमध्ये मालामाल झालेल्या ऑस्ट्रेलियन क्रिकेटरने पत्नीसाठी खरेदी केले इतक्या कोटींचे घर

कोरोना पाठ सोडेना! भारतीय दिग्गजांनंतर महिला संघाची ही क्रिकेटर कोरोनाच्या विळख्यात

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---