बांगलादेश क्रिकेट संघ सध्या न्यूझीलंड दौऱ्यावर आहे. उभय संघात मंगळवार रोजी (३० मार्च) दुसरा टी२० सामना पार पडला. हा सामना जिंकत टी२० मालिकेत पुनरागमन करण्यासाठी पाहुणा बांगलादेश संघ झगडताना दिसला. दुसरीकडे यजमान न्यूझीलंड संघ विजयी घौडदौड काय राखण्याचा प्रयत्न करताना दिसला.
दरम्यान बांगलादेशचा क्रिकेटपटू तस्कीन अहमद याने न्यूझीलंडचा सलामीवीर मार्टिन गप्टिल याचा अप्रतिम झेल पकडला. तस्किनच्या झेलनंतर गप्टिलने दिलेली रिऍक्शन बघण्यासारखी होती. यावेळचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.
तर झाले असे की, नाणेफेकीचा कौल बांगलादेशच्या बाजूने लागल्यानंतर त्यांनी गोलंदाजी निवडली आणि न्यूझीलंडला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केले. यावेळी फिन ऍलेनसोबत गप्टिल सलामीला उतरला. संघाला मोठी आकडी धावसंख्या उभारुन देण्याच्या उद्देश्याने त्याने पहिल्याच चेंडूपासून फटकेबाजी करायला सुरुवात केली. ११६.६७ च्या स्ट्राईक रेटने फलंदाजी करताना त्याने १८ चेंडूत २१ धावा चोपल्या. या खेळीसाठी १ षटकार आणि २ चौकारही मारले.
दरम्यान डावातील सहावे षटक टाकण्यासाठी आलेल्या सैफुद्दीनच्या षटकातील शेवटच्या चेंडूवर तो शॉर्ट फाइन लेगला चौकार खेचायला गेला. इतक्यात क्षेत्ररक्षक तस्किनने डाव्या अंगाला डाईव्ह मारत एका हाताने चेंडू पकडला. स्वत गप्टिललाही आपला झेल जाण्याची शक्यता वाटली नव्हती. मात्र तस्किनच्या अप्रतिम झेलला पाहून तो थक्क झाला. अचंबित झाल्याचे हावभाव देत तो एकटाच हसू लागला.
https://twitter.com/taimoorze/status/1376785430234927104?s=20
गप्टिलनंतर न्यूझीलंडच्या इतर फलंदाजाना खास कामगिरी करता आली नाही. एकटच्या ग्लेन फिलिप्सने नाबाद ५८ धावा करत संघाची खिंड लढवली. डॅरिल मिचेलनेही त्याला पूरेपुर साथ दिली. यामुळे न्यूझीलंडने बांगलादेशला ५ बाद १७३ धावांचे लक्ष्य दिले.
महत्त्वाच्या बातम्या-
कोरोना पाठ सोडेना! भारतीय दिग्गजांनंतर महिला संघाची ‘ही’ क्रिकेटर कोरोनाच्या विळख्यात
रिषभच्या दमदार फॉर्ममुळे ‘या’ यष्टीरक्षकांची कारकिर्द संकटात, टीम इंडियाचे दरवाजे होणार बंद!
बायो बबलचा असाही फायदा; रोहित-विराटमधील नातेसंबंधात सुधार होत झाले एकमत!