भारतात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. याच पार्श्वभूमीवर अनेक राज्यांमध्ये लॉकडाऊन देखील लावण्यात आले आहे. तरीसुद्धा ही रुग्णसंख्या आटोक्यात येत नसल्याचे दिसत आहे. याचा फटका आता क्रिकेटपटूंना देखील बसू लागला आहे. नुकत्याच पार पडलेल्या भारतीय महिला विरुद्ध दक्षिण आफ्रिका महिला यांच्यातील मालिकेत भारतीय संघासाठी प्रमुख भूमिका बजावणाऱ्या हरमनप्रीत कौरला कोरोनाची लागण झाली आहे.
रोड सेफ्टी वर्ल्ड सिरीज खेळून आल्यानंतर मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर याला कोरोणाची लागण झाली होती. त्याच्यापाठोपाठ एस बद्रीनाथ, युसूफ पठान, इरफान पठान असे भारतीय दिग्गजही कोरोनाच्या विळख्यात सापडले आहेत. अशातच आता आणखी एका क्रिकेटपटूची भर पडली आहे. भारतीय महिला क्रिकेट संघाची कर्णधार हरमनप्रीत कौर हिला कोरोनाची लागण झाली आहे.
असे म्हटले जात आहे की, १७ मार्चला खेळल्या गेलेल्या सामन्यात तिला दुखापत झाली होती. त्यानंतर तिला हलका ताप आला. सोमवारी तिची कोरोना चाचणी केली असता ती पॉझिटिव्ह आली आहे. दक्षिण आफ्रिका संघाविरुद्ध मालिका सुरू असताना तिची अनेक वेळा चाचणी केली गेली होती. परंतु तेव्हा ती निगेटिव्ह आली होती. अशी शक्यता वर्तवली जात आहे की, ही मालिका झाल्यानंतर तिला कोरोनाची लागण झाली असावी. हरमनप्रीत कौरने स्वतःला घरातच आइसोलेशमध्ये ठेवले आहे.
कोरोना महामारीनंतर पहिल्यांदाच भारतीय महिला संघ आंतरराष्ट्रीय मालिका खेळण्यासाठी मैदानात आला होता. दक्षिण आफ्रिकन महिला संघाविरुद्ध झालेल्या वनडे आणि टी-२० मालिकेत त्यांना पराभवाचा सामना करावा लागला आहे. वनडे मालिकेत हरमनप्रीत कौरने चमकदार कामगिरी केली होती. तिने एका सामन्यात अर्धशतक झळकावले होते, तर एका सामन्यात तिला ४० धावा करण्यात यश आले होते.
महत्त्वाच्या बातम्या-
रिषभच्या दमदार फॉर्ममुळे ‘या’ यष्टीरक्षकांची कारकिर्द संकटात, टीम इंडियाचे दरवाजे होणार बंद!
बायो बबलचा असाही फायदा; रोहित-विराटमधील नातेसंबंधात सुधार होत झाले एकमत!
भर सामन्यात शार्दुलचे अश्लील कृत्य, इंग्लिश फलंदाजांना दाखवलं मधले बोट; चाहत्यांनी केलं ट्रोल





