इंग्लंड विरुद्ध भारत यांच्यात मंगळवारी (१२ जुलै) केनिंग्टन ओव्हल येथे खेळला गेलेला पहिला वनडे सामना भारताने एकतर्फी जिंकला. पाहुण्या भारतीय संघाने या सामन्यात आपले निर्विवाद वर्चस्व गाजवले. आधी गोलंदाजी नंतर फलंदाजीत धडाकेबाज प्रदर्शन करत इंग्लंडवर १० विकेट्सने दणदणीत विजय मिळवला. भारतीय संघाच्या या विजयानंतर प्रसिद्ध उद्योगपति आनंद महिंद्रा यांनी लक्षवेधी ट्वीट केले आहे.
या सामन्यात (ENG vs IND) प्रथम फलंदाजीसाठी उतरलेल्या इंग्लंड संघाची भारताच्या गोलंदाजांनी दाणादाण उडवली. जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) आणि मोहम्मद शमी यांच्या धारदार गोलंदाजीपुढे इंग्लंडचा संघ २५.२ षटकात ११० विकेट्सवर गारद झाला. प्रत्युत्तरात भारतीय संघाने सलामीवीरांच्या ११४ धावांच्या अभेद्य भागीदारीच्या जोरावर १८.४ षटकातच सामना जिंकला. हा वनडे सामना असूनही भारतीय संघाने टी२० प्रमाणे अतिशय वेगाने खेळला आणि जिंकलाही.
यावरूनच ट्वीट करत आनंद महिंद्रा (Anand Mahindra) यांनी लिहिले (Anand Mahindra On India Win) आहे की, “इंग्लंडला इतक्या लाजिरवाणा पराभव बघण्यासाठी भाग पाडल्यामुळे मी भारतीय संघाविरुद्ध तक्रार दाखल करणार आहे. कारण जेव्हा मी टीव्ही चालू केला, तेव्हापर्यंत तर सामना संपला होता.”
थोडक्यात आनंद महिंद्रांनी अप्रत्यक्षपणे इंग्लंडच्या संघावर निशाणा साधला आहे. त्यांनी भारताच्या हातून इतक्या वाईट पद्धतीने पराभूत होण्यासाठी इंग्लंडच्या संघाची पायखेची केली आहे.
I’m filing a complaint against #TeamIndia For such a brutally dominant victory in such a short time. Because by the time I switched on the TV, the match was done… 😊 https://t.co/eamaNlZxAR
— anand mahindra (@anandmahindra) July 13, 2022
प्रथम फलंदाजी करत असलेल्या इंग्लंड संघाची भारताच्या गोलंदाजांनी पुरती दैना केली. जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद शमी या अनुभवी वेगवान गोलंदाजांनी इंग्लंडला ११० धावांवरच रोखले. इंग्लंडकडून कर्णधार जोस बटलर सर्वाधिक ३० धावा करू शकला. तसेच डेविड विलीने २१ धावांचे आव्हान दिले. इंग्लंडचे ४ फलंदाज तर शून्य धावेवर बाद झाले. या डावात बुमराहने सर्वाधिक ६ विकेट्स घेत वनडे कारकिर्दीतील सर्वोत्तम गोलंदाजी प्रदर्शन केले. ७.२ षटकात १९ धावा देत त्याने या विकेट्स घेतल्या. तसेच शमीनेही त्याला चांगली साथ दिली. त्याने ३१ धावा देत ३ विकेट्स घेतल्या.
रोहित शर्मा आणि शिखर धवन या सलामी जोडीने जबरदस्त भागीदारी रचली. कर्णधार रोहितने ५८ चेंडूत ५ षटकार आणि ६ चौकारांच्या मदतीने नाबाद ७६ धावा केल्या. तसेच धवनने ५४ चेंडूत ३१ धावांची उपयुक्त खेळी करत संघाला १८.४ षटकातच सामना जिंकून दिला.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-
विराटची पाठराखण करत माजी खेळाडूने साधला टिकाकरांवर नेम म्हटला, ‘त्याला थेट ड्रॉप…’
लॉर्ड्सवर भारत-इंग्लंडमध्ये कोण ठरलंय वरचढ, जाणून घ्या दोन्ही संघांचा या मैदानावरील विक्रम
‘एलेक्सा, प्लीज प्ले जसप्रीत बुमराह’, भारताच्या माजी क्रिकेटपटूच ट्वीट होतंय व्हायरल