नवी दिल्ली । भारत देशाचे माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांची आज दुसरी पुण्यतिथी. वयाच्या ८४व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला होता. २०१२ ते २०१७ या काळात ते देशाचे राष्ट्रपती होते. त्यांना २०१९मध्ये देशाचा सर्वाच्च सन्मान भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.
प्रणव मुखर्जी हे एक उत्कृष्ट राजकीय नेता होतेच, पण त्यांना खेळाबद्दलही प्रेम होते. २०१३ मध्ये ते राष्ट्रपती असताना त्यांच्या हस्ते नवी दिल्लीतील प्रेसिडेंशियल इस्टेट येथे नव्या क्रिकेट मैदानाचे उद्घाटन झाले होते. उद्घाटनावेळी ७७ वर्षांचे असलेल्या प्रणव दांनी हातात बॅटही घेतली होती. तसेच त्यांनी काही बॉल टोलावले होते. या दरम्यानचे अनेक फोटो त्यावेळी व्हायरल झाले होते.
विशेष म्हणजे प्रणव मुखर्जी यांना भारतीय क्रिकेट नियामक मंडळाकडून (बीसीसीआय) अध्यक्षपदासाठी १९८०च्या सुमारास ऑफर देण्यात आली होती. पण त्यांनी ती स्विकारली नव्हती.
काहीवर्षांपूर्वी त्यांनी याबाबत खुलासा केला होता. भारतातील क्रिकेटच्या एका डॉक्यूमेंट्रिमध्ये बोलताना त्यांनी सांगितले होते की ‘१९८० च्या दशकाच्या सुरुवातीला जेव्हा मला भारतीय क्रिकेट बोर्डाच्या अध्यक्षपदाची ऑफर मिळाली तेव्हा मला आश्चर्य वाटले होते. ही गोष्ट २५ वर्षांपूर्वीची होती.’
पण प्रणवदांनी ही ऑफर लगेचच नाकारली होती. ते म्हणाले होते, ‘मी तिथे काय करु.’ तसेच त्यांनी सांगितले की एक गावाकडील मुलगा म्हणून त्यांना क्रिकेटपेक्षा फुटबॉल जास्त आवडायचा.
याबरोबरच बीसीसीआयचे माजी अध्यक्ष बीएन दत्त यांनीही खुलासा केला होता की प्रणवदांच्या घरी जगमोहन दालमिया अध्यक्षपदाची ऑफर देण्यासाठी गेले होते. पण सुरुवातील प्रणवदांनी हो म्हटले होते पण त्यांनी सांगितले होते की ते आधी त्यावेळच्या पंतप्रधान इंदिरा गांधीशी चर्चा करतील. दुसऱ्या दिवशी प्रणवदांनी ही ऑफर नाकारली. त्यावेळी त्यांनी सांगितले होते की इंदिराजी त्यांना म्हणाल्या होत्या की त्यांच्याजवळ यासाठी वेळ आहे का? यापेक्षा त्यांना काही महत्त्वाची कामे करायची आहेत.
प्रणवदांना कपिल देव यांनी एक बॅटही भेट दिली होती. त्यावेळी त्या बॅटवर त्याकाळच्या खेळाडूंच्या स्वाक्षऱ्या होत्या.
हेही वाचा-
वर्ष १९८० मध्येच प्रणवदांना मिळाली होती बीसीसीआयच्या अध्यक्षपदाची ऑफर
गोष्ट एका क्रिकेटरची भाग ९: म्हैसुर एक्सप्रेस जवागल श्रीनाथ