इंग्लंडचा दिग्गज वेगवान गोलंदाज जेम्स अँडरसन अलीकडेच भारताविरुद्ध पुनर्निर्धारित कसोटी सामन्यात खेळताना दिसला. या सामन्यात त्याने विराट कोहलीविरुद्ध गोलंदाजी केली. मात्र, यावेळी कोहली खराब फॉर्ममध्ये असूनही अँडरसनविरूद्ध बाद झाला नाही. अँडरसनने सामन्याच्या पहिल्या डावात जबरदस्त गोलंदाजी करत भारताच्या पाच फलंदाजांना बाद केले. आता याच अँडरसनने पुन्हा विराटविरूद्ध गोलंदाजी करण्याबाबत एक मोठे विधान केले आहे.
इंग्लंडचा दिग्गज वेगवान गोलंदाज असलेला जेम्स अँडरसन लवकरच ४० वर्षांचा होत आहे. अशा स्थितीत तो पुन्हा भारताविरुद्ध इंग्लंडमध्ये खेळेल का नाही याची शाश्वती नाही. कारण, भारतीय संघ यानंतर जवळपास तीन वर्षानंतर इंग्लंडमध्ये खेळण्यासाठी जाईल. त्यामुळे अँडरसन त्यापूर्वी निवृत्त होऊ शकतो. याच कारणाने बहुचर्चित विराट कोहली व जेम्स अँडरसन यांच्यातील जुगलबंदी चाहत्यांना दिसणार नाही. त्याबाबत अँडरसनला छेडले असता तो म्हणाला,
“हे घडेल की नाही हे आम्हाला माहीत नाही. मी विराटला पुन्हा एकदा गोलंदाजी करण्यासाठी इच्छुक आहे. कदाचित मी पुढच्या दौऱ्यासाठी थांबूही शकतो.”
जेम्स अँडरसन आणि विराट कोहली यांच्यातील जुगलबंदी सर्व क्रिकेटजगताला चांगलीच परिचित आहे. विराटला अँडरसनने २०१४ दौऱ्यावेळी चार कसोटीच्या चार डावात तंबूत पाठवले होते. मात्र, त्यानंतर २०१८ दौऱ्यावेळी तो विराटला एकदाही बाद करू शकला नव्हता. आपल्या अखेरच्या दौऱ्यातही अँडरसनला त्याला दोन वेळा बाद करण्यात यश आले होते. मात्र, यावर्षी झालेला अखेरच्या कसोटीत विराटने अँडरसनसमोर शरणागती पत्करली नव्हती. भारताचा माजी वेगवान गोलंदाज जहीर खान यानेदेखील या दोघांमधील बॅटल संस्मरणीय राहिले असे म्हटले. मात्र, आपण त्यांना कदाचित यापुढे एकमेकांविरुद्ध कसोटीत खेळताना पाहू शकणार नाही अशी देखील त्याने शक्यता वर्तवली.
महत्त्वाच्या बातम्या-
बीसीसीआय उपाध्यक्षांचा राजीनामा! ‘या’ कारणाने घेतला घाईत निर्णय
इंग्लंड दौऱ्यातील पाच पराक्रम, जे टीम इंडियाला बनवतील टी-२० वर्ल्ड कप चॅम्पियन
श्रीसंतचे बडेबोल! म्हणतोय, “मी असतो तर भारताने चार वर्ल्डकप जिंकले असते”