भारतीय संघाचा युवा फलंदाज नितीश कुमार रेड्डीनं ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या बॉर्डर-गावस्कर मालिकेत शानदार कामगिरी केली होती. त्यानं मेलबर्न कसोटीत शतक झळकावून संपूर्ण जगाला चकित केलं. मालिका संपल्यानंतर भारतात आगमन झाल्यावर त्याचं विमानतळावर जंगी स्वागत झालं.
नुकतेच आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्रबाबू नायडू यांनी रेड्डी परिवाराची भेट घेतली. यावेळी त्यांनी नितीश कुमार रेड्डीचा सत्कार केला. मुख्यमंत्र्यांनी नितीशला सन्मानचिन्ह आणि 25 लाख रुपयांचा चेक बक्षीस म्हणून दिला. या भेटीचं छायाचित्र मुख्यमंत्र्यांनी आपल्या सोशल मिडिया पेजवर शेयर करत नितेशचं कौतुक केलं आहे. त्यांनी पोस्टच्या कॅप्शनमध्ये लिहिलं, नितीशनं भविष्यात अनेक शतकं करावीत आणि आपल्या देशाचं नाव रोशन करावं. या भेटी दरम्यान नितीश कुमार रेड्डीचे वडील देखील उपस्थित होते.
मुख्यमंत्र्यांना भेटण्यापूर्वी नितीशनं तिरुपती बालाजी देवस्थानाला भेट दिली होती. त्यानं इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ शेयर केला, ज्यामध्ये तो गुडघ्याने पायऱ्या चढत असल्याचं दिसत आहे.
Met with the exceptionally talented young cricketer, our very own @NKReddy07, today. Nitish is truly a shining star of the Telugu community, bringing pride to India on the global stage. I commended his parents for the support they’ve given him throughout his journey. Wishing him… pic.twitter.com/qEGHXvkMDw
— N Chandrababu Naidu (@ncbn) January 16, 2025
बॉर्डर-गावस्कर मालिकेत नितीश कुमार रेड्डी भारतासाठी सर्वाधिक धावा करणारा दुसरा फलंदाज होता. त्यानं ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या मालिकेत 298 धावा केल्या. विशेष म्हणजे, तो संपूर्ण मालिकेत सातव्या किंवा आठव्या क्रमांकावर फलंदाजीला आला होता. नितीशनं फलंदाजीसोबतच गोलंदाजीतही आपली चमक दाखवली. त्यानं गोलंदाजी करताना 5 विकेट्स आपल्या नावावर केल्या.
मेलबर्न कसोटीत नितीशनं 114 धावांची खेळी करून भारताला फॉलोऑनपासून वाचवलं होतं. त्यावेळी त्याचे वडील स्टेडियममध्ये उपस्थित होते. नितीशची खेळी पाहून त्यांना अश्रू अनावर झाले होते. नितीशच्या त्या खेळीचं सर्वांनी खूप कौतुक केलं होतं. त्याची ही खेळी पाहून अनेकांनी त्याला फलंदाजीत वरच्या क्रमांकावर संधी मिळायला हवी, अशी मागणी केली आहे.
हेही वाचा –
IPL 2025; केएल राहुल नाही तर हा खेळाडू होऊ शकतो दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार
खेळाडूंची मजा संपली, बीसीसीआयने उचलले मोठे पाऊल, लादले 10 कडक निर्बंध
KHO KHO WC; भारताने ग्रुप स्टेजच्या शेवटच्या सामन्यात भुटानला नमवलं, 71-34 ने दणदणीत विजय