---Advertisement---

व्हिडिओ : सुपरमॅन आंद्रे फ्लेचर! एकाच सामन्यात पकडले दोन अविश्वसनीय झेल

On: सोमवार, जानेवारी 4, 2021 10:21 PM
---Advertisement---

ऑस्ट्रेलिया मध्ये सध्या बिग बॅश लीग स्पर्धा सुरू आहे. या स्पर्धेत प्रत्येक सामन्यात क्रिकेट रसिकांना क्रिकेटची पर्वणी बघायला मिळत आहे. नुकत्याच मेलबन स्टार्स व होबार्ट हरिकेन्स मध्ये पार पडलेल्या सामन्यात, मेलबर्नचा खेळाडू आंद्रे फ्लेचरने दोन अविश्वसनीय झेल पकडलेले आहेत.फ्लेचरच्या या झेलांचा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात सोशल मीडियात वायरल होत आहे.

फ्लेचरने पहिला झेल पकडला तो होबार्ट हरिकेन्सच्या सतराव्या षटकातील पाचव्या चेंडूवर. बिली स्टॅनलिक गोलंदाजीसाठी आला असता त्याने टाकलेल्या चेंडूवर फलंदाज कॉलिंन इंग्रामने आक्रमक फटका मारला, मात्र फ्लेचरने हवेत सुर घेत अविश्वसनीय झेल पकडला. सर्व क्रिकेट रसिक फ्लेचरच्या या झेलचे कौतुक करत असतानाच एकोणिसाव्या षटकातील शेवटच्या चेंडूवर फलंदाज बेन मॅकडरमॉटने मारलेल्या फटक्यावर पुन्हा एकदा फ्लेचरने उत्तम झेल पकडला. फ्लेचरच्या या क्षेत्ररक्षणाचे मोठ्या प्रमाणात कौतुक केले जात असून, त्याचे हे दोन्ही झेल मोठ्या प्रमाणावर सोशल मीडियात वायरल होत आहेत.

https://twitter.com/ESPNcricinfo/status/1346041114332073984

दरम्यान सामन्याचा विचार केला असता, मेलबन स्टार्सने होबार्ट हरिकेन्सचा 10 धावांनी पराभव केला. प्रथम फलंदाजी करणाऱ्या मेलबर्नने 20 षटकात 183 धावांपर्यंत मजल मारली होती. प्रत्युत्तरात होबार्टला केवळ 173 धावाच करता आल्या. फ्लेचरला या सामन्यात फलंदाजीत उत्तम कामगिरी करता आली नाही. फ्लेचरने केवळ 10 धावा बनवल्या होत्या . आगामी सामन्यात फ्लेचरकडून संघाला फलंदाजीत देखील उत्तम कामगिरीची अपेक्षा असणार आहे.

महत्वाच्या बातम्या:

भारतीय संघावर टीका करणाऱ्या ऑस्ट्रेलियन मंत्र्याला वसीम जाफर यांचे सडेतोड उत्तर, केले असे ट्विट

विंडीजविरुद्धच्या मालिकेसाठी बांग्लादेशच्या संघाची घोषणा; शाकिब अल हसनचे पुनरागमन, तर या माजी कर्णधाराला डच्चू

ऑस्ट्रेलियाने मारली आपल्याच पायावर कुर्‍हाड? संघातून वगळण्यात आलेल्या फलंदाजाने बिग बॅश लीगमध्ये ठोकले अर्धशतक

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---