महेंद्रसिंह धोनीची चेन्नईमध्ये देवासारखी पूजा केली जाते. चेन्नईचे चाहते धोनीला ‘थाला’, महेंद्र बाहुबली अशा विविध नावांनी ओळखतात. धोनीची एक झलक पाहण्यासाठी चाहते अक्षरश: वेडे झालेले असतात.
असंच काहीसं दृष्य सोमवारी (8 एप्रिल) चेन्नई सुपर किंग्ज आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यातील सामन्यादरम्यान पाहायला मिळालं. चेन्नईच्या ऐतिहासिक चेपॉक स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात महेंद्रसिंह धोनी जेव्हा फलंदाजीसाठी मैदानावर उतरला, तेव्हा स्टेडियम प्रेक्षकांच्या आवाजानं दणाणलं होतं. यावेळी कोलकाता नाईट रायडर्सचा अष्टपैलू खेळाडू आंद्रे रसेल सीमारेषेवर उभा होता. प्रेक्षकांचा एवढा मोठा आवाज ऐकून तो देखील हैराण झाला आणि त्यानं आपले कान हातानं झाकून घेतले! आंद्रे रसेलचा असं करतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे.
Andre Russell closing his ears due to the cheers from crowd when MS Dhoni in the batting at Chepauk.🤯
– THE CRAZE & AURA OF DHONI IS UNREAL, THE BRAND…!!!!🙌🐐 pic.twitter.com/jf8RIr5fTr
— CricketMAN2 (@ImTanujSingh) April 8, 2024
या सामन्यात धोनी फलंदाजीला उतरला तेव्हा चेन्नईला 18 चेंडूंमध्ये 3 धावांची आवश्यकता होती. धोनीनं कर्णधार ऋतुराज गायकवाडला विजयी धाव घेऊ दिली, ज्यानंतर आता चाहते त्याचं कौतुक करत आहेत. सीएसकेनं या सामन्यात केकेआरचा 7 गडी राखून पराभव केला. नाणेफक हरल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना कोलकातानं निर्धारित 20 षटकांत 9 गडी गमावून केवळ 137 धावा केल्या होत्या. चेन्नईनं हे लक्ष्य 17.4 षटकांत 3 गडी गमावून सहज गाठलं.
एसएस धोनीनं या सामन्यात चाहत्यांबरोबर एक मजेदार प्रँक केलं. चेन्नईचा वेगवान गोलंदाज तुषार देशपांडेनं सांगितलं की, एमएस धोनी आणि रवींद्र जडेजानं मिळून एक प्लॅन बनवला होता. हा प्लॅन असा होता की, धोनी बॅटिंगला जाण्यापूर्वी जडेजा तयार होऊन मैदानावर जाईल आणि लगेच वापस येईल. शिवम दुबे आऊट झाल्यानंतर चाहत्यांना वाटलं होतं धोनी मैदानावर येईल, मात्र जेव्हा जडेजा पॅव्हेलियनमधून बाहेर आला तेव्हा सगळेच हैराण झाले. यानंतर जडेजा काही पावलं चालल्यानंतर परत फिरला आणि मग धोनी मैदानावर आला.
केकेआरविरुद्धच्या विजयानंतर चेन्नईच्या नावे 5 सामन्यांमध्ये 3 विजय आहेत. संघ गुणतालिकेत 6 गुणांसह चौथ्या स्थानावर आहे. तर केकेआर 4 सामन्यांमध्ये 3 विजय आणि एका पराभवानंतर गुणतालिकेत दुसऱ्या स्थानी आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
आरसीबीच्या प्रशिक्षकानं सांगितलं राजस्थानविरुद्धच्या पराभवाचं कारण; म्हणाले, “आम्हाला 200 धावा….”
झालं गेलं गंगेला मिळालं! धोनी-गंभीरनं एकमेकांना मारली मिठी, सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल
चेन्नई सुपर किंग्ज विजयी ट्रॅकवर परतली, कोलकाताचा हंगामातील पहिला पराभव