2019 विश्वचषक स्पर्धा 30 मेपासून इंग्लंड आणि वेल्समध्ये होणार आहे. या विश्वचषकासाठी आता सर्व संघांनी त्यांचे प्राथमिक 15 जणांचे संघ घोषित केले आहेत. बुधवारी रात्री विंडीज संघाने 15 जणांचा संघ जाहीर केला. विंडीजने या विश्वचषकासाठी सर्वात शेवट संघ जाहीर केला आहे.
बुधवारी जाहीर झालेल्या विंडीजच्या 15 जणांच्या संघाचे नेतृत्व जेसन होल्डर करणार आहे. तसेच या संघात आंद्रे रसल, ख्रिस गेल अशा आक्रमक फलंदाजांचाही समावेश करण्यात आला आहे.
यावर्षी आयपीएलमध्ये तुफानी फलंदाजी करणाऱ्या रसलने अनेक महिन्यांनंतर विंडिजच्या वनडे संघात पुनरागमन केले आहे. त्याने विंडीजकडून शेवटचा वनडे सामना जुलै 2018 मध्ये बांगलादेश विरुद्ध खेळला आहे.
त्यानंतर फेब्रुवारीमध्ये त्याला इंग्लंड विरुद्ध शेवच्या दोन वनडेसाठी विंडीज संघात संधी मिळाली होती. परंतू त्याला दुखापतीमुळे या मालिकेत खेळता आले नव्हते.
रसल बरोबरच विंडीजच्या संघात वेगवान गोलंदाज शेल्डन कॉटरेल आणि शेनन गॅब्रिएल यांचेही पुनरागमन झाले आहे. त्यांच्याबरोबर विंडीडच्या संघात वेगवान गोलंदाज म्हणून केमार रोच, ओशेन थॉमस यांचाही समावेश करण्यात आला आहे.
विंडीज संघाच्या यष्टीरक्षणाची जबाबदारी ही मुख्य करुन निकोलस पुरनकडे असेल. पण त्याचबरोबर यष्टीरक्षक म्हणून शाय होपचाही पर्याय आहे.
या विंडीज संघात फलंदाजीच्या फळीत ख्रिस गेल, डॅरेन ब्रावो हे अनुभवी क्रिकेटपटू आहेत. तसेच एव्हिन लुईस, शिमरॉन हेटमेयर यांनाही विंडीज संघात संधी देण्यात आली आहे. त्याचबरोबर विंडीजच्या संघाच चांगल्या अष्टपैलू खेळाडूंचाही समावेश आहे. यात रसल, कार्लोस ब्रेथवेट, होल्डर अशा नावांचा समावेश आहे.
असा आहे 2019 विश्वचषकासाठी विंडीजचा संघ –
जेसन होल्डर (कर्णधार), ख्रिस गेल, आंद्रे रसल, शेल्डन कॉटरेल, शॅनन गॅब्रिएल, केमार रोच, निकोलस पूरन (यष्टीरक्षक), ऍशले नर्स, फॅबियन ऍलन, शिमरॉन हेेटमर, शाय होप (यष्टीरक्षक), ओशन थॉमस, कार्लोस ब्रॅथवेट, डॅरेन ब्राव्हो , इव्हिन लुईस.
BREAKING: @windiescricket name their #CWC19 squad! pic.twitter.com/Ca61nyDmc8
— ICC Cricket World Cup (@cricketworldcup) April 24, 2019
महत्त्वाच्या बातम्या –
–सीएसकेसाठी विजयी खेळी साकारणाऱ्या शेन वॉटसनने मानले या दोघांचे आभार…
–महिला आयपीएल २०१९: बीसीसीआयने घोषित केले महिला ट्वेंटी २० चॅलेंजचे वेळापत्रक
–आशियाई कुस्ती चॅम्पियनशीपमध्ये महाराष्ट्राच्या राहुल आवारेला कांस्यपदक