वेस्टइंडीज आणि ऑस्ट्रेलिया संघामध्ये शुक्रवारी (16 जुलै) झालेल्या पाचव्या आणि शेवटच्या टी20 सामन्यामध्ये वेस्टइंडीजने विजय मिळवत मालिका 4-1 अशा फरकाने जिंकली. या सामन्यात वेस्ट इंडिज संघाचा अष्टपैलू क्रिकेटपटू आंद्रे रसेलकडून खराब फलंदाजी पाहायला मिळाली, मात्र त्याने गोलंदाजीत आपली कमाल दाखवली.
या सामन्यात प्रथम फलंदाजी करणाऱ्या वेस्ट इंडिज संघाकडू रसल सहाव्या क्रमांकावर फलंदाजीसाठी उतरला होता. मात्र, केवळ तिसरा चेंडू खेळतानाच तो अँड्र्यू टायच्या चेंडूवर अॅलेक्स कॅरीकडे झेल देत बाद झाला. त्याने केवळ 1 धाव केली. पण, नंतर गोलंदाजीला आल्यावर रसेलने 4 षटकांत 3 मोठे विकेट घेतले. त्यामुळे वेस्टइंडीज सांगायला विजयाच्या जवळ पोहोचण्याचा मार्ग मोकळा झाला.
सहाव्या क्रमांकावर मैदानावर उतरलेला रसेलला अँड्र्यू टायच्या चेंडूवर अॅलेक्स कॅरीने झेलबाद केले. रसेल फक्त 1 धाव करत पॅव्हेलियनमध्ये परतला. यानंतर गोलंदाजीसाठी आलेल्या रसेलने 4 षटकांत 3 मोठे विकेट घेतले. त्यामुळे वेस्टइंडीजला विजयाच्या जवळ पोहोचण्यात मदत झाली.
या सामन्यात गोलंदाजी करताना रसेलने पहिली विकेट डावाच्या पाचव्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर मिशेल मार्शची घेतली. आक्रमक फलंदाजी करत मिशेल मार्शने 14 चेंडूंमध्ये 30 धावा केल्या होत्या. जेव्हा रसेलने पहिला चेंडू टाकला तेव्हा मिशेलने तो सरळ दिशेने खेळण्याचा प्रयत्न केला, परंतु तो चुकला आणि चेंडू खाली राहिला. रसेलने स्वत:च्याच गोलंदाजीवर शानदार झेल पकडत मिशेलला पॅव्हेलियनमध्ये परत पाठवले.
यानंतर रसेलने डावाच्या 14 व्या षटकातील पहिल्या चेंडूलर 9 धावांवर खेळत असलेल्या अॅलेक्स कॅरीला देखील बाद केले. कॅरीने रसेलच्या फुल लेंथ चेंडूवर लॉन्ग ऑफवरून फटका मारण्याचा प्रयत्न केला होता, परंतु चेंडू बॅटवर नीट आला नाही. त्यामुळे तिथे उभा असलेल्या लेंडल सिमन्सने झेल पकडत त्याला ही तंबूत परत पाठवले.
त्यानंतर १६ व्या षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर यष्टीरक्षक फलंदाज मॅथ्यू वेडला रसेलने आपला बळी बनविला. मॅथ्यू वेडने 17 चेंडूमध्ये 26 धावा केल्या होत्या. रसेलने चालाखी करत गुड लेन्थवर चेंडू टाकला. त्यावर वेडने तो चेंडू मिड विकेटच्या वरून मारण्याचा प्रयत्न केला. परंतु, बॅटची कडा लागल्याने तो चेंडू थेट स्टंपवर आदळला आणि वेड त्रिफळाचीत होत तंबूत परतला. याप्रकारे रसेलने ऑस्ट्रेलिया विरुद्ध शेवटच्या सामन्यात तीन मोठे विकेट घेत उत्कृष्ट गोलंदाजी केली.
If not with the bat, he does it with the ball.
Andre Russell took three wickets yesterday, at regular intervals between overs (5-16). pic.twitter.com/xSv1AvTs4F— ???????????????????????? (@StarkAditya_) July 17, 2021
कॉट्रेलनेही घेतले 3 बळी
वेस्ट इंडिज संघाकडून रसेल व्यतिरिक्त करत शेल्डन कॉट्रेलनेेही उत्कृष्ट गोलंदाजी केली. त्याने 4 षटकांमध्ये 28 धावा देत 3 विकेट घेतल्या. त्याने आपल्या उत्कृष्ट गोलंदाजीने जोश फिलिपला 0, अँड्रयू टाय 15 धावा आणि जेसन बेरेनड्रॉफला 5 धावांवर बाद केले.
या सामन्यात वेस्ट इंडिजने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात 8 बाद 199 धावा केल्या होत्या. तसेच 200 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाला 20 षटकात 9 बाद 183 धावाच करता आल्या.
महत्त्वाच्या बातम्या –
पुन्हा खेळणार का कसोटी क्रिकेट? भुवनेश्वर कुमारने दिले ‘हे’ उत्तर
श्रीलंका वि. भारत: दोन्ही संघांना खुणावतायेत नवे विक्रम; शिखर करू शकतो ‘हा’ पराक्रम
‘न भूतो’! अखेरच्या षटकात सलग सहा षटकार ठोकत ‘या’ खेळाडूने संघाला मिळवून दिले विजेतेपद






