---Advertisement---

पाच वर्षांनी दिले फ्लिंटॉफने अमिताभ बच्चन यांना उत्तर, ‘हा’ होता प्रश्न

On: शनिवार, फेब्रुवारी 6, 2021 6:29 PM
---Advertisement---

भारत विरुद्ध इंग्लंड संघात ४ सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिला सामना शुक्रवारपासून (५ फेब्रुवारी) सुरु झाला आहे. एमए चिदंबरम स्टेडियमवर सुरु असलेल्या या सामन्याचा आज (६ फेब्रुवारी) दुसरा दिवस आहे. दुसऱ्या दिवशी इंग्लंडचा कर्णधार जो रुट द्विशतकी खेळी केली.

पहिल्या दिवसापासून चिवट फलंदाजी करत रूटने भारतीय गोलंदाजांना पुरते हतबल केले. त्याचाच आधार घेत इंग्लंडचा माजी अष्टपैलू खेळाडू ऍण्ड्रू फ्लिंटॉफ याने प्रसिद्ध भारतीय अभिनेते अमिताभ बच्चन यांच्या पाच वर्षांपूर्वीच्या एका प्रश्नाचे उत्तर त्यांचेच ट्विट रिट्विट करत मजेदार पद्धतीने दिले.

रूटने ठोकले दमदार द्विशतक

भारताविरुद्धच्या कसोटी मालिकेतील पहिल्या सामन्यातील दुसऱ्या दिवशी इंग्लंडचा कर्णधार जो रूटने २१८ धावांची विक्रमी खेळी केली. त्यानंतर, इंग्लंडचा माजी अष्टपैलू ऍण्ड्रू फ्लिंटॉफ याने भारतातील प्रसिद्ध अभिनेते अमिताभ बच्चन यांचे २०१६ मधील एक ट्विट रिट्विट करत, बच्चन यांच्या पाच वर्षांपूर्वीच्या प्रश्नाचे उत्तर दिले.

ऍण्ड्रू फ्लिंटॉफ याने २०१६ विराट कोहलीच्या बाबतीत ट्विट करताना म्हटले होते, “असाच खेळत राहिला तर, एक दिवस विराटदेखील रूट इतका उत्तम बनेल.” त्यावर अमिताभ बच्चन यांनी म्हटले होते की, “कोण आहे हा रूट ? मुळापासून उपटून टाकू या रूटला.”

अमिताभ बच्चन यांचे हे ट्विट आता रूटच्या द्विशतकानंतर फ्लिंटॉफने रिट्विट करत म्हटले, “खूप मोठ्या सन्मानासह, काळानुसार हे बरोबर लागू झाल.” फ्लिंटॉफच्या या रिट्विट वर अनेकांनी आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. तसेच, त्याला पसंतही केले जात आहे.

इंग्लंडने गाजविले कसोटीचे पहिले दोन दिवस

इंग्लिश कर्णधार जो रूटने नाणेफेक जिंकल्यानंतर प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. युवा सलामीवीर रॉरी बर्न्स व डॉम सिबली त्यांनी संघाला अर्धशतकी सलामी दिली. चौथ्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या रूटने त्यानंतर सिबलीसोबत २०० पेक्षा अधिक धावांची भागीदारी करून पहिल्या दिवशी यजमान भारताला बॅकफूटवर ढकलले.

सामन्याच्या दुसऱ्या दिवशी अष्टपैलू बेन स्टोक्सने वेगवान अर्धशतक झळकावत इंग्लंडच्या डावाला आकार दिला. दुसऱ्या दिवसाचा खेळ थांबला तेव्हा इंग्लंडने ८ बाद ५५५ धावा बनविल्या आहेत. डॉम बेस नाबाद २८ तर लीच ६ धावांवर खेळत आहे. भारताकडून ईशांत शर्मा, जसप्रीत बुमराह, रविचंद्रन आश्विन व शाहबाज नदीम यांनी प्रत्येकी दोन गडी बाद केले.

महत्वाच्या बातम्या:

मला अवॉर्ड मिळणार नाही का? विराटच्या खिलाडूवृत्तीचं कौतुक होत असताना इंग्लिश गोलंदाजाची विनोदी प्रतिक्रिया

INDvsENG 1st Test: जो रुटच्या विक्रमी द्विशतकानंतर इंग्लंडचं शेपूटही वळवळलंच; दुसऱ्या दिवसाअखेर इंग्लंडच्या ८ बाद ५५५ धावा

थँक्यू नदीम! ज्याच्या निवडीवरून केली टीका तोच ठरला टीम इंडियाचा संकटमोचक

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---