वेस्ट इंडीज संघ सध्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर आहे. उभय संघांतील दुसरा आणि शेवटचा कसोटी सामना गुरुवारी (25 जानेवारी) सुरू होईल. ब्रिसबेनमध्ये खेळल्या जाणाऱ्या या सामन्याआधी ऑस्ट्रेलियाच्या कॅम्पमधून मोठी बामती समोर येत आहे. संघाचे मुख्य प्रशिक्षक अँड्र्यू मॅकडॉनल्ड आणि अष्टपैलू कॅमरून ग्रीन यांना कोरोनाची लागण झाली आहे.
तत्पूर्वी ट्रेविस हेड यालाही कोरोनाची लागण झाली होती. पण हेड आता कोरोनातून सावरला आहे आणि तो आता संघाच भाग आहे. क्रिकेट ऑस्ट्रेलियाच्या प्रोटोकॅलनुसार कॅमरून ग्रीन (Cameron Green) आणि अँड्र्यू मॅकडोनाल्ड (Andrew McDonald) यांना कोविड-19 निगेटिव होईपर्यंत संघापासून वेगळे केले गेले आहे. असे असले तरी ग्रीन दुसऱ्या कसोटी सामन्यात खेळू शकतो. गाबा स्टेडियवर एक अतिरिक्त ड्रेसिंग रूम आहे. या ड्रेसिंग रूमचा उपयोग कोरोना महामारी आपल्या टोकावर असताना केली गेलाहोता.
ऑस्ट्रेलियाचा दिग्गज फलंदाज स्टीव स्मिथ याने कॅमरून ग्रीनच्या फिटनेसबाबत माहिती दिली. स्मिथने अशीही माहिती दिली की, वेस्ट इंडीजविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियन संघ त्याच प्लेइंग इलेव्हनसह खेळेल. संघात दुसऱ्या कसोटीसाठी ऑस्ट्रेलियनसंघात एकही बदल होण्याची शक्यता नाहीये. पहिल्या कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियाचा सलामीवीर उस्मान ख्वाजा दुखापतीमुळे बाहेर झाला होता. शेवटच्या डावात त्याच्या हेलमेटवर चेंडू लागला आणि तोंडातून रक्त देखील आले होते. असे असले तरी, वेस्ट इंडीजविरुद्ध दुसऱ्या कसोटी सामन्यात ख्वाजाला खेळण्याची परवानगी दिली गेली आहे.
वेस्ट इंडीज संघ 25 जानेवारीला सुरू होणाऱ्या गाबा कसोटीत जिंकण्यासाठी खेळेल. कारण यजमान ऑस्ट्रेलियाने पहिल्या सामन्यातील विजयानंतर 1-0 अशी आघाडी घेतली आहे. दुसरा सामना वेस्ट इंडीजने जिंकला, तर संघ मालिकेत 1-1 अशी बरोबरी करू शकतो. उभय संघांतील ही कसोटी मालिका संपल्यानंतर तीन सामन्यांची वनडे आणि तीन सामन्यांची टी-20 मालिका खेळली जाणार आहे.
महत्वाच्या बातम्या –
IND vs ENG । हैदराबाद कसोटीतून अँडरसनचा पत्ता कट! ‘हे’ तीन फिरकीपटून ठरवतील सामन्याचा निकाल
BREAKING: सूर्यकुमार यादवने जिंकला आयसीसी पुरुष ‘टी-20 क्रिकेटर ऑफ द इयर’ पुरस्कार, दोनदा कोरलं पुरस्कारावर नाव