मुंबई । ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाचे वरिष्ठ सहाय्यक प्रशिक्षक अँड्र्यू मॅकडोनाल्ड पुढील महिन्यात इंग्लंड दौर्यावर जाणार नाहीत. ऑस्ट्रेलियन क्रिकेट बोर्डाने शुक्रवारी ही माहिती दिली.
क्रिकेट ऑस्ट्रेलियाने दिलेल्या माहितीनुसार, ‘इंडियन प्रीमियर लीगमधील राजस्थान रॉयल्सचे मुख्य प्रशिक्षक म्हणून ते काम पाहत आहेत. आयपीएलमधील प्रशिक्षक पदाची जबाबदारी पार पाडण्यासाठी ऑस्ट्रेलियन पुरुष संघाचे ज्येष्ठ सहाय्यक प्रशिक्षक अँड्र्यू मॅकडोनाल्ड इंग्लंड दौर्यावर जाणार नाहीत.’
ऑस्ट्रेलियाच्या अष्टपैलू खेळाडू अँड्र्यू मॅकडोनाल्डने पॅडी ऍप्टनयांच्या जागी राजस्थान रॉयल्सच्या मुख्य प्रशिक्षकपदाची सूत्रे स्वीकारली आहेत.
ऑस्ट्रेलिया इंग्लंड दौऱ्यात 4 ते 16 सप्टेंबर दरम्यान तीन टी -20 आणि तीन वनडे सामने खेळणार आहे. तसेच आयपीएलचा 13 वा हंगाम संयुक्त अरब अमिरातीमध्ये 19 सप्टेंबर ते 10 नोव्हेंबर दरम्यान भारताबाहेर युएईमध्ये खेळला जाईल. राजस्थान रॉयल्स 20 ऑगस्टला युएईला रवाना होईल. आयपीएल संपल्यानंतर मॅक्डोनाल्ड ऑस्ट्रेलियन पुरुष संघात सामील होतील.
महत्त्वाच्या बातम्या –
बरोबर ३० वर्षांपुर्वी १७ वर्षीय सचिनने केला होता क्रिकेटमध्ये मोठा कारनामा
…आणि त्या शुन्य धावेची कायमची क्रिकेट वर्तुळात चर्चा सुरु झाली
ट्रेंडिंग लेख –
…आणि त्या दिवशी १०० शतकांचा पाया रचला गेला
क्रिकेटला रामराम केल्यावर मॅनेजमेंटची डिग्री घेऊन अमेरिकन एक्सप्रेससाठी काम करणारा क्रिकेटर
आचरेकर सर म्हणत, “प्रवीण हा सचिनपेक्षा काकणभर सरस आहे”