मुंबई । इंग्लंडच्या क्रिकेट संघाने चांगला खेळ करत वेस्ट इंडिजवर दबाव आणला. इंग्लंडने पहिल्या डावात 369 धावा केल्या आणि त्यामध्ये ऑली पोपने सर्वाधिक धावा केल्या. इंग्लंडचा माजी कर्णधार अँड्र्यू स्ट्रॉसचे असे मत आहे की, इंग्लंडला ऑली पोपच्या रूपात एक महान क्रिकेटपटू सापडला आहे जो क्रिकेटच्या तिन्ही स्वरूपात यशस्वी होण्याची क्षमता आहे.
ओली पोपने 150 चेंडूत 91 धावा केल्या. या 22 वर्षीय मुलाने वर्षाच्या सुरुवातीला दक्षिण आफ्रिकेविरूद्ध दोन अर्धशतके झळकावली आणि पोर्ट एलिझाबेथ येथे नाबाद 135 धावांची खेळी केली.
स्ट्रॉसने ‘स्काय स्पोर्ट्स’ वरुन ओली पोपचे कौतुक करत म्हटले की, “जर आपण त्याच्या प्रथम श्रेणीच्या विक्रमाकडे पाहिले तर त्याची सरासरी 57 आहे आणि त्याने दक्षिण आफ्रिकेमध्ये ही महान खेळी करुन कसोटी क्रिकेटमध्ये स्वतःला सिद्ध केले आहे.”
स्ट्रॉस पुढे म्हणाला, “एक असा खेळाडू वेगवान धावा करू शकतो आणि तुम्हाला ते लक्षातही येणार नाही. त्याने काही आकर्षक शॉट्स देखील खेळले. वेगवान आणि फिरकीविरूद्ध तो सहज खेळतो, त्यात कोणताही कमकुवतपणा नाही. मला वाटते की तो इंग्लंलसाठी एक चांगला खेळाडू ठरु शकतो.”
पोपने 2018 मध्ये भारताविरुद्ध कसोटी सामन्यात पदार्पण केले होते. तो अद्याप इंग्लंडकडून व्हाइट बॉल क्रिकेट खेळलेला नाही. मर्यादित षटकांच्या स्वरूपातही तो चांगली कामगिरी करेल, असे स्ट्रॉसचे मत आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
–तब्बल ५ देशांविरुद्ध अँडरसनने केलाय अजब कारनामा, काल तर…
–१४० किलो वजनाच्या वेस्टइंडीजच्या खेळाडूने पकडला अप्रतिम झेल, कॅप्टनही झाला अवाक्
–चीयरलीडर्स ते स्ट्रॅटेजिक टाईम आऊट, पहा काय काय होणार आयपीएल २०२०मध्ये बदल
–निराशाजनक! पदार्पणाच्या वनडे सामन्यातच नर्वस नाइंटिजचे शिकार झालेले ५ क्रिकेटपटू
–टेस्ट इनिंग्स स्पेशल भाग ३- गब्बरची कसोटी क्रिकेटमध्ये जबर एन्ट्री
–अगदी सौरव तिवारीपासून या ६ कर्णधारांच्या अंडर खेळलाय धोनी