---Advertisement---

एँड्र्यू सायमंड्सने क्रिकेटमध्ये कमावला होता अफाट पैसा, कुटुंबासाठी मागे सोडली ‘इतक्या’ कोटींची संपत्ती

Andrew-Symonds
---Advertisement---

क्रिकेट जगातामध्ये रविवारी (१५ मे) शोककळा पसरली आहे. ऑस्ट्रेलियाचा माजी अष्टपैलू एंड्र्यू सायमंड्स शनिवारी (१४ मे) रात्री अपघातामध्ये मृत्यूमुखी पडला. क्रिकेट ऑस्ट्रेलियाकडून सायंड्सच्या निधनाची पुष्टी केली गेली. सायमंड्स जागतिक क्रिकेटमधील महान अष्टपैलू खेळाडूंपैकी एक होता. जगभरातील दिग्गज क्रिकटपटूंनी सायमंड्सला श्रद्धांजली अर्पण केली आहे. सायमंड्सने त्याच्या कारकिर्दीत अफाट पैसा कमावला. आपण या लेखात त्याच्या संपत्तीविषयी माहिती घेणार आहोत.

एंड्र्सू सायमंड्सच्या क्रिकेट कारकिर्दीवर नजर टाकायची झाली, तर २००३ मध्ये अप्रतिम प्रदर्शन करून त्याने विश्वचषक संघात स्थान मिळवले होते. तो २००७ विश्वचषकात ऑस्ट्रेलियाचे प्रतिनिधित्व करत होता. आयपीएलचा पहिला हंगाम २००८ साली आयोजित केला गेला होता आणि सायमंड्स या हंगामातील सर्वात महागडा खेळाडू बनला होता. सायमंड्सने पहिल्या तीन हंगामात डेक्कन चार्जर्स संघाचे प्रतिनिधित्व केले आणि पुढे तो मुंबई इंडियन्ससाठी देखील खेळला. आयपीएल २०११ त्याचा शेवटचा हंगम ठरला. त्या कारकिर्दीप्रमाणेच त्याचे राहणीमान देखील आलिशान होते. त्याच्या क्रिकेटच्या जोरावर त्याने अफाट पैसा कमावला.

सायमंड्सचा जन्म ९ जून १९७५ मध्ये इंग्लंडच्या बर्मिंगममध्ये झाला होता. तो ऑस्ट्रेलियन होता, पण त्याचे लहानपण इंग्लंडमध्येच गेले. २० वर्षाचा असताना सायमंड्सने इंग्लंडमध्ये ग्लॅमर्गनविरुद्धच्या एका सामन्यात १६ षटकार मारले आणि प्रकाशझोतात आला. त्याच्या कुटुंबात त्याची पत्नी आणि दोन मुले आहेत. त्याच्या निधनानंतर पत्नी आणि मुले टाउंसविलेकडे रवाना झाले आहेत. त्याने कुटुंबीयांसाठी पाठीमागे कोट्यावधी रुपयांची संपत्ती सोडली आहे.

भारतीय रुपयाच्या हिशोबात त्याने ३८ कोटी ७४ लाख रुपयांपेक्षा अधिकची संपत्ती कुटुंबासाठी सोडली आहे. त्याच्या या कमाईचा मुख्य स्रोत क्रिकेट राहिले आहे. त्याने देशांतर्गत, आंतरराष्ट्रीय आणि विश्वचषकांव्यतिरिक्त आयपीएलसारख्या टी-२० लीगमध्ये मोठ्या प्रमाणात पैसा कमावला. मोठ्या कारकिर्दीनंतर २०१२ मध्ये त्याने क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. तो महिन्याला ४० हजार डॉलर्स कमवायचा, तर त्याचे वार्षीक उत्पन्न ५ लाख डॉलर्स होते.

व्हिडिओ पाहा- 

धडाकेबाज क्रिकेटपटू तरीही दारूडा म्हणून ओळखला जाणारा ऍण्ड्रू सायमंड्स | Andrew Symonds | Cricket

सायमंड्सने ऑस्ट्रेलिया संघासाठी २६ कसोटी सामने खेळले आणि यामध्ये १४६२ धावा केल्या. तसेच १९८ एकदिवसय आणि १४ टी-२० सामन्यांमध्ये देखील त्याने ऑस्ट्रेलिया संघाचे प्रतिनिधित्व केले.

महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा

महत्वाच्या बातम्या –

एक लाजरा न साजरा मुखडा…! सारा तेंडूलकर बनली ‘राजकुमारी’, फोटोंवरून हटणार नाही तुमचीही नजर

खेळाडू मैदानावर बॉल पँटवर का घासतात? जाणून घ्या कारण

‘त्याला बाहेर काढण्याची हीच योग्य वेळ’, विलियम्सनच्या खराब फॉर्ममुळे सेहवागचा हैदराबादला मोलाचा सल्ला

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---