मंगळवारी (३ ऑगस्ट) रोजी बांगलादेश आणि ऑस्ट्रेलिया संघात पहिला टी२० सामना खेळला गेला. बांगलादेशने हा सामना आरामात जिंकत आघाडी घेतली. मात्र, यादरम्यान ऑस्ट्रेलियन वेगवान गोलंदाज ऍण्ड्रू टाय सामन्यादरम्यान मैदानावर पूर्णपणे अस्वस्थ दिसत होता. आपल्या वाट्याच्या अखेरच्या षटकातील शेवटचा चेंडू टाकण्यापूर्वी टाय अचानकपणे अस्वस्थ झाला व त्याने उलट्या केल्या. त्याचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
अशी घडली घटना
ही घटना डावाच्या बांगलादेशच्या डावातील १९ व्या षटकात घडली. आपल्या वाट्याचा अखेरचा चेंडू टाकण्यापूर्वी त्याला अचानकपणे अस्वस्थ वाटू लागले. टायच्या चेहऱ्यावरून स्पष्ट जाणवत होते की, त्याला खूप त्रास होत आहे. रन-अप घेण्यासाठी जात असताना त्याला एकापाठोपाठ दोन उलट्या झाल्या. उलट्या होऊनही टायने मैदान सोडले नाही व शेवटचा चेंडू देखील टाकला. टायने अप्रतिम गोलंदाजी करत आपल्या ४ षटकात अवघ्या २२ धावा देत एक बळी मिळविला.
Poor tye..vomiting in the match
Vomiting in the running match#ausvsbd pic.twitter.com/YsssrqMNJu— Shazidzzz (@shazidzzz) August 3, 2021
टी२० विश्वचषकासाठी दावेदार आहे टाय
ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात युएई येथे खेळविण्यात येणाऱ्या टी२० विश्वचषकासाठी ऑस्ट्रेलिया संघात निवड होण्याची टायला आशा आहे. ३४ वर्षीय टायने ऑस्ट्रेलियासाठी आत्तापर्यंत ३० आंतरराष्ट्रीय टी२० सामने खेळताना ३१ बळी आपल्या नावे केले आहेत. मिचेल स्टार्क, जोस हेझलवूड, पॅट कमिन्स यांच्या साथीला चौथा वेगवान गोलंदाज म्हणून तो केन रिचर्डसन व झाय रिचर्डसन यांच्याशी स्पर्धा करेल. विश्वचषकआधी तो आयपीएलमध्ये राजस्थान रॉयल्स संघासाठी खेळताना दिसू शकतो.
टी२० मालिकेत ऑस्ट्रेलिया पिछाडीवर
बांगलादेश दौऱ्यावर पाच टी२० सामन्यांच्या मालिकेसाठी आलेल्या ऑस्ट्रेलिया संघाला पहिल्या दोन सामन्यांमध्ये दारुण पराभव पत्करावा लागला आहे. बांगलादेशने ऑस्ट्रेलियाला पहिल्या सामन्यात २३ धावांनी तर, दुसऱ्या सामन्यात ५ गडी राखून पराभव केले. आपले आव्हान टिकून ठेवण्यासाठी शुक्रवारी होणाऱ्या सामन्यात ऑस्ट्रेलियाला विजय मिळवणे अनिवार्य आहे. या दौऱ्यापूर्वी ऑस्ट्रेलिया संघाला वेस्ट इंडिजविरुद्ध देखील टी२० मालिकेत ४-१ ने पराभूत व्हावे लागले होते.
महत्त्वाच्या बातम्या –
Video: पंतच्या हट्ट ठरला टीम इंडीयासाठी फायदेशीर, डीआरएससाठी विराटला समजवल्याने मिळाली मोठी विकेट
बॉक्सिंगमध्ये देशाला मिळवून दिले पदक, आता महिनाभराची सुट्टी घेणार लवलीना
टी२० विश्वचषकातील भारत-पाकिस्तान सामन्याची तारिख समजल्यानंतर सोशल मीडियावर मीम्सचा सुळसुळाट