भारत विरुद्ध इंग्लंड संघात ५ फेब्रुवारीपासून ४ सामन्यांची कसोटी मालिका सुरु होणार आहे. या मालिकेतील पहिले दोन सामने चेन्नई येथे तर शेवटचे दोन सामने अहमदाबाद येथे होणार आहेत. या मालिकेआधी नेहमीप्रमाणे आजी-माजी खेळाडूंनी वाकयुद्ध सुरु केले आहे. नुकतेच झिम्बाब्वेचे माजी कर्णधार आणि इंग्लंडचे यशस्वी समजले जाणारे प्रशिक्षक अँडी प्लॉवर यांनी म्हटले आहे की इंग्लंडकडे काही दमदार खेळाडू आहेत जे भारताला आव्हान देऊ शकतात.
फ्लॉवर हे एका वृत्तसंस्थेशी बोलताना म्हणाले, ‘भारताने ऑस्ट्रेलियामध्ये टी२० मालिका जिंकली आणि यावर्षी मेलबर्न आणि ब्रिस्बेन येथे कसोटी सामने जिंकले, तसेच दोन वर्षांपूर्वीही कसोटी मालिका जिंकली. यावरून दिसून येते की भारत दौर्यावर असलेल्या पाहुण्या संघाला(इंग्लंड) आपली छाप सोडण्याची पुष्कळ संधी आहे.’
तसेच फ्लॉवर यांना जेव्हा विचारण्यात आले की भारत विरुद्ध इंग्लंड संघात होणाऱ्या मालिकेसाठी कोणाला विजयाचा दावेदार मानतात, तेव्हा त्यांनी कोणत्याही संघाचे नाव घेतले नाही.
ते म्हणाले, ‘कोणत्या संघाचे वर्चस्व राहिल हे आत्ता सांगणे घाईचे ठरेल. तरी इंग्लंड संघाकडे काही दमदार खेळाडूंचे चांगले संयोजन आहे. त्यांच्यामुळे इंग्लंड संघ या मालिकेत चांगली कामगिरी करु शकतो आणि जिंकूही शकतो.’
फ्लॉवर पुढे म्हणाले, ‘या मालिकेदरम्यान बरेच काही सामन्याच्या दिवसावर आणि महत्त्वाच्या संधींचा फायदा घेण्यावर अवलंबून असेल. इंग्लंडकडे काही दमदार खेळाडू आहेत, ज्यांनी प्रत्येक प्रकारात चांगली कामगिरी केली आहे.’
नऊ वर्षांपूर्वी २०१२ साली इंग्लंडने भारताला भारतात कसोटी मालिकेमध्ये पराभूत केले होते. त्यावेळी केविन पीटरसन, ऍलिस्टर कूक, इयान बेल या क्रिकेटपटूंनी शानदार कामगिरी केली होती. विशेष म्हणजे २००४ पासून भारताला भारतात पराभूत करणारा इंग्लंड हा एकमेव संघ आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
“रिषभ पंत भविष्यातील स्टार”, भारताच्या फलंदाजी प्रशिक्षकांनी केली मुक्तकंठाने प्रशंसा
पदार्पणाच्या सामन्यातच पाकिस्तानच्या ‘या’ फिरकीपटूचा धुमाकूळ; ७१ वर्षांनंतर केलाय मोठा कारनामा






