श्रीलंका क्रिकेट बोर्ड आणि खेळाडूंमध्ये गेल्या काही महिन्यांपासून वार्षिक करारावरून वाद सुरू होता. हा वाद भारत विरुद्ध श्रीलंका यांच्यातील मर्यादित षटकांची मालिका झाल्यानंतर काही काळ थंडावला होता. परंतु, आता एक नवीन वृत्त समोर आले आहे. ज्यामध्ये श्रीलंका संघातील महत्वाच्या खेळाडूंचे नाव वार्षिक करारातून वगळण्यात आले आहे.
या करारात श्रीलंका संघाचा अनुभवी अष्टपैलू खेळाडू अँजेलो मॅथ्यूज याला स्थान देण्यात आली नाही. यासह बंदी लावण्यात आलेले तीन खेळाडू दनुष्का गुणाथिलका, निरोशन डिकवेला और कुसल मेंडिस यांचा देखील श्रीलंका संघाच्या वार्षिक करारात स्थान देण्यात आले नाही. या करारावर १८ खेळाडूंनी हस्ताक्षर केले असून या कराराचा कालावधी १ ऑगस्ट पासून सुरू झाला आहे. ही माहिती श्रीलंकन क्रिकेट बोर्डने दिली आहे.
श्रीलंका क्रिकेट बोर्डने स्पष्ट केले आहे की, अँजेलो मॅथ्यूजचे नाव करारबद्ध खेळाडूंच्या यादीत नाही, कारण तो निवडीसाठी उपलब्ध नव्हता. तसेच दनुष्का गुणथिलका, निरोशन डिकवेला आणि कुसल मेंडिस यांच्यावर बंदी लावण्यात आल्यामुळे त्यांचे नाव करारबद्ध खेळाडूंच्या यादीत समाविष्ट करण्यात आले नाही. तसेच इसुरु उडानाने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे.
बायो बबल नियमांचे केले होते उल्लंघन
श्रीलंकेच्या निलंबित केलेल्या तीनही खेळाडूंनी इंग्लंड दौऱ्यावर असताना बायो बबलच्या नियमांचे उल्लंघन केले होते. जगभरात कोरोनाचे सावट पसरले आहे. त्यामुळे आंतरराष्ट्रीय सामने हे कठोर बायोबबलचे पालन करून खेळवले जात आहेत. या खेळाडूंनी बायो बबलचे नियम तोडल्यामुळे सर्वांच्या चिंतेत वाढ झाली होती. ही चूक केल्यामुळे त्यांच्यावर २५,००० डॉलर्सचा दंड देखील आकारण्यात आला होता.
या तिन्ही खेळाडूंनी जून महिन्यात झालेल्या इंग्लंड दौऱ्यात तिसऱ्या वनडे साम्यन्यापूर्वी बायो बबलच्या नियमांचे उल्लंघन केले होते.
अँजेलो मॅथ्यूजने वेस्ट इंडिज संघाविरुद्ध खेळला होता शेवटचा सामना
अँजेलो मॅथ्यूज हा गेल्या काही महिन्यांपासून श्रीलंका संघातून बाहेर आहे. नुकताच श्रीलंका आणि भारत या दोन्ही संघांमध्ये मर्यादित षटकांची मालिका पार पडली होती. या मालिकेत अँजेलो मॅथ्यूजला संधी देण्यात आली नव्हती. मॅथ्यूजने शेवटचा सामना या वर्षाच्या सुरुवातीला वेस्ट इंडिज संघाविरुद्ध खेळला होता.
या १८ खेळाडूंचा कराराच्या यादीत करण्यात आला समावेश
धनंजया डी सिल्वा, कुसल परेरा, दिमुथ करुणारत्ने, सुरंगा लकमल, दसुन शनका, वनिन्दु हसरंगा, लसिथ एम्बुलडेनिया, पथम निसंका, लाहिरु थिरिमन्ने, दुशमंथा चमीरा, दिनेश चांडीमल, लक्षण संदकन, विश्वा फर्नांडो, ओशादा फर्नांडो, रमेश मेंडिस, लाहिरू कुमारा, अशेन बंडारा आणि अकिला धनंजय.
महत्त्वाच्या बातम्या –
Video: लॉर्ड्सवरील ऐतिहासिक विजयानंतर लंडनमध्ये भारतीय चाहत्यांनी धरला ‘सात समंदर पार’ गाण्यावर ठेका