---Advertisement---

IND vs ENG । सरफराजला धावबाद केल्यामुळे जडेजावर संतापला रोहित? लाईव्ह सामन्यातील दोघांमध्ये राडा

On: गुरूवार, फेब्रुवारी 15, 2024 5:40 PM
Rohit Sharma Angry on Ravindra jadeja
---Advertisement---

सरफराज खान याने गुरुवारी (15 फेब्रुवारी) अखेर कसोटी पदार्पण केले. मागच्या काही रणजी हंगामांमध्ये सरफराजची सरासरी धावसंख्या 100च्या आसपास राहिली होती. असे असले तरी, युवा फलंदाजाला भारताकडून खेळण्याची संधी मागच्या काही वर्षांमध्ये मिळाली नाही. गुरुवारी त्याने कसोटी पदार्पण केले आणि पहिल्याच डावात अर्धशतक देखील ठोकले. सरफराज राजकोट कसोटीच्या पहिल्या डावात ज्या पद्धतीने बाद झाला, त्यानंतर कर्णधार रोहित शर्मा याला राग अनावर झाल्याचे दिसले.

उभय संघांतील या सामन्याची नाणेफेक भारताने जिंकली. पहिल्या दिवसाखेर भारताने 5 विकेट्सच्या नुकसानावर 326 धावांपर्यंत मजल मारली. सरफराज खान याने 66 चेंडूत 62 धावांपर्यंत मजल मारली. कर्णधार रोहित शर्मा (196 चेंडूत 131 धावा) याच्यानंतर रविंद्र जडेजा (212 चेंडूत 110*) यानेही शतक ठोकले. पण जडेजाने स्वतःची विकेट वाचवण्यासाठी सरफराज खान (Sarfaraz Khan) याच्या विकेटचा वळी दिला, असे अनेक चाहत्यांना वाटत आहे. कर्णधार रोहित शर्मा देखील सरफराज धावबाद झाल्यानंतर संतापला होता.

भारताच्या पहिल्या डावातील 82व्या षटकात सरफराज खान धावबाद झाला. षटकातील पाचव्या चेंडूवर रविंद्र जडेजा याने शॉट खेळला. चेंडू खेळून काढल्यानंतर जडेजाने नॉन स्ट्राईक एंडवरील सरफराज खान याला सिंगल खेण्यासाठी आवाज दिल्याचे पाहायला मिळाले. पण चेंडू मार्क वूड याच्या हातात पाहिल्यानंतर जडेजाने आपला निर्णय बदलला. पण तोपर्यंत सरफराज नॉन स्ट्राईक एंडपासून काही पावले बाहेर आला होता. सरफराजसाठी पुन्हा क्रीजच्या आतमध्ये पोहोचणे अशक्य होते. अशात वूडने वेळ साथली आणि नॉन स्ट्राईक एंडवर त्याला धावबाद केले. ही घटन पाहून कर्णधार रोहित इतका चिडला की, त्याने आपल्या डोक्यातील कॅप खाली फेकली. ड्रेसिंग रुममधील हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

दरम्यान, सरफराजने आपल्या कसोटी कारकिर्दीतील पहिल्याच सामन्यात 66 चेंडूत 62 धावा केल्या.
(Angry Rohit Sharma when Sarfaraz Khan got run-out. )

तिसऱ्या कसोटी सामन्यासाठी इंग्लंडची प्लेईंग ईलेव्हन – बेन स्टोक्स (कॅप्टन), झॅक क्रॉली, बेन डकेट, ओली पोप, जो रूट, जॉनी बेअरस्टो, बेन फोक्स, रेहान अहमद, टॉम हार्टले, मार्क वुड आणि जेम्स अँडरसन.

तिसऱ्या कसोटी सामन्यासाठी टीम इंडियाची प्लेईंग ईलेव्हन – रोहित शर्मा (कर्णधार), जसप्रीत बुमराह (उपकर्णधार), यशस्वी जयस्वाल, शुबमन गिल, रजत पाटीदार, सरफराज खान, ध्रुव जुरेल (विकेटकीपर), आर अश्विन, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, रवींद्र जडेजा.

महत्वाच्या बातम्या – 
वेलकम टू टीम इंडिया! पदार्पणाच्या सामन्यात सरफराजचे अर्धशतक, वडील आणि पत्नी भावूक
IND Vs ENG : रोहित शर्माने कसोटीत केला खास विक्रम, धोनीलाही टाकले मागे

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---