---Advertisement---

अन् आपल्या राग आवरत विराट पत्रकाराच्या प्रश्नाला उत्तर देताना फक्त म्हणाला, ‘हो, धन्यवाद’

On: मंगळवार, ऑगस्ट 31, 2021 1:45 AM
---Advertisement---

इंग्लंडविरुद्धच्या तिसऱ्या कसोटीत भारतीय संघाला एक डाव आणि 76 धावांनी पराभव स्वीकारावा लागला. कसोटीच्या चौथ्या दिवशी झालेल्या पराभवानंतर पत्रकार परिषदेत आलेल्या भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीसोबत एक विचित्र घटना घडली.

एका दीर्घ प्रश्नाला उत्तर देताना विराट कोहलीने आपल्या रागावर नियंत्रण ठेवले आणि तो फक्त एवढेच म्हणू शकला – ‘हो, धन्यवाद…’

ऑनलाईन पत्रकार परिषदेदरम्यान एका पत्रकाराने त्याला फलंदाजीच्या तंत्राबद्दल प्रश्न विचारला. जेव्हा कोहलीने उत्तर देण्यास सुरुवात केली, तेव्हा त्या पत्रकाराने विराटच्या उत्तराकडे दुर्लक्ष करत मध्येच बोलायला सुरुवात केली. या मॅचमध्ये बॅकफूटवर खेळण्याच्या त्याच्या रणनीतीबद्दल पत्रकाराने त्याला प्रश्न विचारला होता. यावर विराट म्हणाला – प्रामाणिकपणे सांगायचे तर, मला माहित नाही की या प्रश्नाचे उत्तर कसे द्यावे? जोपर्यंत चेंडू त्याच्या लेंथनुसार येत नाही. तुम्ही प्रत्येक चेंडू बॅकफूटवर कसा खेळू शकता?

कोहली आपला मुद्दा पूर्ण करण्याआधीच पत्रकाराने सांगायला सुरुवात केली – भारतीय संघाने बॅकफूटवर कमी खेळल्यामुळे जास्त धावा काढण्याची संधी हुकली. इथे कोहलीच्या चेहऱ्यावर थोडा राग होता, पण त्याने स्वतःला सांभाळताना उत्तर दिले – होय, धन्यवाद. या क्षणाचा व्हिडिओ ट्विटरवर खूप व्हायरल होत आहे.

हेडिंग्ले येथे खेळल्या गेलेल्या मालिकेच्या तिसऱ्या कसोटीत भारताचा पहिला डाव 78 धावांवर संपुष्टात आला होता, तर इंग्लंडने पहिल्या डावात 432 धावा केल्या आणि 354 धावांची आघाडी घेतली. भारतीय संघाचा दुसरा डाव 278 धावांवरच आटोपला आणि भारतीय संघाला डावाच्या पराभवाने सामोरे जावे लागले.

यासह इंग्लडने मालिकेतही 1-1 अशी बरोबरी केली आहे. याआधी भारतीय संघांने इंग्लडला लॉर्ड्स कसोटीत पराभूत केले होते. पहिली कसोटी पावसामुळे अनिर्णित राहिली होती. चौथा कसोटी सामना येत्या 2 सप्टेंबरपासून ओव्हल येथे खेळला जाणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या – 

आयर्लंडने झिम्बाब्वेला नमवत मालिकेत साधली बरोबरी, ‘केविन ओ ब्रायन ठरला’ सामनावीर

हाँगकाँगसाठी आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारा क्रिकेटपटू आता ओडिसासाठी खेळणार रणजी ट्राॅफी

Video: अमेरिकेत उन्मुक्त चंदची बॅट तळपली; चौकार-षटकारांची बरसात करत ठोकले दुसरे अर्धशतक

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---