पुणे। डेक्कन जिमखाना क्लबच्या वतीने आयोजित रावतेकर ग्रुप पुरस्कृत अनिल जी.रानडे मेमोरियल डेक्कन जिमखाना क्रिकेट लीग 2022 स्पर्धेत अंतिम फेरीत साहिल गोवित्रीकर(19धावा) व पार्थ चिवटे(2-5) यांच्या सुरेख कामगिरीच्या जोरावर ऍक्वा रायडर्स संघाने स्नो लेपर्ड्स संघाचा 7 गडी राखून पराभव करत विजेतेपद संपादन केले.
डेक्कन जिमखाना क्रिकेट मैदानावर पार पडलेल्या या स्पर्धेत अंतिम फेरीच्या लढतीत प्रथम फलंदाजी करताना स्नो लेपर्ड्स संघाने 6षटकात 5बाद 45धावाचे आव्हान उभे केले. यात सौरभ दाते 16, रोहित बर्वे 13, रोहन पटवर्धन 8 यांनी छोटी पण महत्वपूर्ण खेळी करत संघाच्या डावाला आकार दिला. ऍक्वा रायडर्स संघाकडून पार्थ चिवटे(2-5), तेज दीक्षित(1-11) यांनी सुरेख गोलंदाजी केली.
याच्या उत्तरात ऍक्वा रायडर्स संघाने 4.2षटकात 1बाद 47धावा करून पूर्ण केले. यामध्ये साहिल गोवित्रीकर 19, शैलेश बांगले नाबाद 18, तेज दीक्षित नाबाद 7 यांनी धावा काढून संघाला विजय मिळवून दिला. सामन्याचा मानकरी साहिल गोवित्रीकर ठरला.
स्पर्धेतील विजेत्या ऍक्वा रायडर्स संघाला अनिल रानडे स्मृती चषक व पदके अशी पारितोषिके देण्यात आली. स्पर्धेचे पारितोषिक वितरण ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले, डॉ.आनंद भूषण रानडे, डेक्कन जिमखानाचे सरचिटणीस गिरीश इनामदार, रावेतकर ग्रुपचे अमोल रावेतकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी क्लबच्या वित्तीय विभागाचे सचिव मिहीर केळकर, विश्वेश कटक्कर, एमसीएचे सचिव रियाज बागवान, कोटक बँकचे ओंकार जलादी आदी मान्यवर उपस्थित होते. मुकुंद जोशी यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.
निकाल: अंतिम फेरी:
स्नो लेपर्ड्स: 6षटकात 5बाद 45धावा(सौरभ दाते 16(9,1×4), रोहित बर्वे 13(10,2×4), रोहन पटवर्धन 8, पार्थ चिवटे 2-5, तेज दीक्षित 1-11)पराभूत वि.ऍक्वा रायडर्स: 4.2षटकात 1बाद 47धावा(साहिल गोवित्रीकर 19(10,3×4), शैलेश बांगले नाबाद 18(12,2×4), तेज दीक्षित नाबाद 7, सचिन गोडबोले 1-18);सामनावीर-साहिल गोवित्रीकर;ऍक्वा रायडर्स संघ 7 गडी राखून विजयी.
इतर पारितोषिके:
सर्वोत्कृष्ट फलंदाज: नहूश जाधव(124धावा, रोहन स्ट्रायकर्स);
सर्वोत्कृष्ट गोलंदाज: तेज दीक्षित(6 विकेट)
मालिकावीर: साहिल गोवित्रीकर(102धावा, 4विकेट)
महत्त्वाच्या बातम्या –
इशानचं नशीबच फुटकं! बिश्नोईच्या चेंडूवर विचित्र पद्धतीने झाला बाद, पाहणारा प्रत्येकजण हैराण
गेल, वॉर्नर अन् रैनालाही जे जमलं नाही, ते राहुलने मुंबईविरुद्ध करून दाखवलं; बनला थेट ‘टॉपर’