आयपीएल 2023 (IPL 2023 Auction) साठी शुक्रवारी (23 डिसेंबर) कोचीमध्ये खेळाडूंचा लिलाव पार पडला. लिलावात भारतीय आणि विदेशी दिग्गजांवर कोट्यावधी रुपये खर्च केले. आयपीएलच्या सर्व यशस्वी संघांपैकी एक असलेल्या चेन्नई सुपर किंग्सने देखील या लिलावात अनेक मोठ्या खेळाडूंना आपल्या ताफ्यात सामील करून घेतले. तरीदेखील, अनेक जण चेन्नईला विजयाचा दावेदार मानत नाहीत. अशा परिस्थितीत भारतीय संघाचे माजी कर्णधार व दिग्गज फिरकीपटू अनिल कुंबळे यांनी मोठे वक्तव्य केले आहे.
आयपीएल 2023 लिलावात चेन्नईने इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्स, भारताचा अजिंक्य रहाणे, इंग्लंडचा कायले जेमिसन या आंतरराष्ट्रीय खेळाडूंसह चार देशांतर्गत क्रिकेटमधील गुणवान खेळाडू आपल्या ताफ्यात सामील करून घेतले. अशा स्थितीत अनेक समीक्षक चेन्नईला विजेतेपदाचे दावेदार बांधताना दिसले नाही. काहींनी चेन्नईला दहा पैकी गुण देताना 6-7 असे गुण दिले. त्यावरच बोलताना अनिल कुंबळे म्हणाले,
“चेन्नई संघासाठी लिलाव कसा गेला याने काहीच फरक पडत नाही. ज्यावेळी तिथे कर्णधार म्हणून धोनी असतो, त्यावेळी त्यांना तुम्हाला 9 पेक्षा कमी गुण देऊन चालत नाही.”
एमएस धोनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त झाला असला तरी त्याच्या नेतृत्वाची जादू अजूनही कायम आहे. चेन्नई त्याच्याच नेतृत्वात चार वेळा आयपीएलचे विजेतेपद पटकावले. मात्र, आयपीएल 2020 मध्ये चेन्नई सुपर किंग्सचा खराब काळ सुरू झाला होता. त्यावेळी संघात अनुभवी खेळाडूंची संख्या जास्त असल्यामुळेही त्यांच्यावर वारंवार टीका देखील होत होती. परंतु, 2021 मध्ये सीएसकेने या टीकांना चोख उत्तर देत विजेतेपद पटकावले. असे असले तरी, सीएसकेचे हे प्रदर्शन 2022 हंगामात कायम राहू शकले नाही. या हंगामात सीएसके 9 व्या क्रमांकावर राहिला.
(Anil Kumble Big Statement On CSK And MS Dhoni)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
लाईव्ह कार्यक्रमात गेलचा अनिल कुंबळेंवर आयपीएल कारकीर्द संपवल्याचा आरोप; म्हणाला…
श्रीलंकेविरुद्धच्या टी-20 मालिकेतून रोहित-राहुलचा पत्ता कट? कारणही घ्या जाणून